Budget 2019 : अर्थसंकल्पात रेल्वेची कसलीच ठोस घोषणा नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकारने आपल्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प आज मांडण्यात आला आहे. या बजेट मध्ये सरकारने रेल्वेसाठी काही विशेष घोषणा केली नसून ‘वंदे भारत’ हि नवीन एक्स्प्रेस सुरु करण्यात येणार आहे अशी घोषणा करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे देशात कोठेही मानव विरहित रेल्वे फाटक उरले नाही असा दावा देखील पियुष गोयल यांनी अर्थसंकल्प मांडताना केला आहे.

रेल्वेसाठी काही विशेष घोषणा केली गेली नसली तरी रेल्वेसाठी ६४ हजार ५८० कोटी रुपयांची तरतूद या अर्थसंकल्पात केली आहे. ‘वंदे भारत’ ही नवी सेमी हायस्पीड ट्रेन सुरु करण्यात येईल अशी घोषणा पियुष गोयल यांनी केली आहे.

मोदी सरकार केंद्रात विद्यमान झाल्यानंतर रेल्वेचा वेगळा सादर केला जाणारा अर्थसंकल्प एकत्रित सादर केला जाऊ लागला आहे. त्याच प्रमाणे रेल्वे हि केंद्र सरकारचे उत्पन्नाचे मोठे साधन आहे. म्हणून या क्षेत्रात सरकारचे विशेष लक्ष आहे.

मोदी सरकाने रेल्वेच्या क्षेत्रात मोठी सुधारणा केली आहे. त्याच प्रमाणे देशातील १ हजार रेल्वे स्थानके डिजिटल करण्यात आली आहेत. त्याच प्रमाणे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत रेल्वे स्थानका वरील अस्वच्छता झटकून टाकण्यात आली आहे. मात्र आजच्या अर्थसंकल्पात रेल्वे बद्दल कसलीही ठोस घोषणा केली नाही. यामुळे रेल्वे या विषयाबद्दल आजचा अर्थसंकल्प न्याय देणारा नाही असे एकंदर चित्र आहे.