केंद्रीय अर्थसंकल्प : आता ८.५ लाखापर्यंतच्या उत्पन्नावर टॅक्स नाही ?, ‘हे’ आहेत ३ पर्याय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता मोदी सरकार कारभाराला लागले असून पुढील महिन्यात ५ तारखेला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थसंकल्प सादर करतील. या अर्थसंकल्पात सामान्य नागरिकांना दिलासा देण्याच्या प्रयत्न मोदी सरकार करत असल्याची माहिती मिळत आहे.

लोकसभा निवडणुकीच्या आगोदर फेब्रुवारी महिन्यात तत्कालीन अर्थमंत्री पियुष गोयल यांनी अर्थसंकल्प सादर केला होता. त्यात त्यांनी सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी आयकरात सूट देण्याचे वक्तव्य केलं होते, त्यामुळे आता या अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन काही निर्णय घेतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

त्यामुळे आता टॅक्स स्लॅबमध्ये काही बदल करून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. मात्र यात काही बदल केला नाही तर मोदी सरकार अनेकविध मार्गांनी दिलासा देण्याचा प्रयत्न करणार आहे.

१)गुंतवणुकीवर आयकर सूट

या सगळ्यात मोदी सरकार या विषयावर देखील विचार करत आहे. या अर्थसंकल्पत मोदी सरकार नागरिकांना गुंतवणुकीवर आयकरात सूट देण्याचा विचार करता असून यामुळे नागरिकांना याचा फायदा मिळेल. दीड लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीला टॅक्स लागत नाही मात्र सरकार हि मर्यादा वाढवून अडीच लाख रुपये करण्याचा विचारात आहे. त्याचप्रमाणे आता ५ लाख रुपयांपर्यंतचे असलेलं उत्त्पन्न आयकरात येत नाही, मात्र सरकार हि मर्यादा साडेआठ लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचा विचार करत आहे.

२)स्टॅंडर्ड डिडक्शन वर सूट
या घडीला सध्या तुम्हाला ५० हजार रुपयांपर्यंतची सूट मिळते. पूर्वी हि मर्यादा ४० हजार रुपये होती. यात तुम्ही तुमच्या वर्षभरातील पगाराच्या तुम्हाला ५० हजार रुपयांवर टॅक्स बसत नाही. मात्र हे ५० हजार रुपये कुठे गुंतवले आहेत याचे तुम्हाला पुरावे द्यावे लागतात. यामध्ये देखील सरकार वाढ करून सामान्यांना दिलासा देण्याचं प्रयत्न करणार आहे.

३)टॅक्स सेस मध्ये सूट

त्याचबरोबर टॅक्स भरताना जो सेस घेतला जातो त्यामध्ये देखील सूट देण्याचा सरकार विचार करत असल्याची माहिती मिळत आहे, त्यामुळे सामान्य नागरिकांना अनेकविध मार्गानी सरकार सूट देण्याचा प्रयत्न करणार आहे.

आरोग्य विषयक वृत्त – 

केळीच्या सालीचे उपाय चकित करणारे, जाणून घ्या फायदे

अर्थरायटिसला दूर करण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

सुंदर दिसण्यासाठी ‘हे’ ७ पदार्थ चेहऱ्यावर चुकूनही लावू नका

डोळ्यांच्या इन्फेक्शनपासून असा करा बचाव