इलेक्ट्रिक वाहनांवरून ‘उद्योगपती’ राजीव बजाज यांचा सरकारला ‘सवाल’ ; म्हणाले, ‘आम्ही काय दुकान बंद करून घरी बसायचं ?’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोस्ताहन देणार असल्याचे सांगितले. याबरोबर येणाऱ्या काळात इलेक्ट्रिक वाहनासंबंधित विविध योजना आणणार असल्याचे देखील स्पष्ट केले. परंतू बजाज ऑटोचे MD राजीव बजाज यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. राजीव बजाज यांच्या मते इलेक्ट्रिक वाहनांवर सरकारची ही योजना व्यवहारिक नाही. परिस्थिती अशी होत आहे की वाहन बनवणाऱ्या कंपन्याना आपले दुकान बंद करण्याची वेळ येऊ शकते.

राजीव बजाज म्हणाले की इलेक्ट्रिक वाहनांवर ऑटो मेकर्स कंपन्यांनी कोणताही निर्णय घेतला नाही. एखाद्या OEM असो किंवा एक स्टार्टअप, तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार वाहन बनवू शकतात.

सरकारला राजीव बजाज यांचा सवाल –
राजीव बजाज यांनी सरकारच्या इलेक्ट्रिक वाहन इंडस्ट्रीच्या विस्तारावर शंका उपस्थित केली आहे. राजीव बजाज यांच्या मते देशात एका रात्रीत सर्व काही करण्याचा प्रयत्न असतो त्यामुळेच कोणतीही योजना योग्य प्रकारे लागू होत नाहीत. ते म्हणाले, भविष्यात इलेक्ट्रिक व्हेईकल इंडस्ट्रीचा विस्तार १ टक्क्यांने कमी होणार आहे. मला हे लक्षात येत नाही की फक्त ६ वर्षात इंडस्ट्रीचा १०० टक्के विस्तार कसा होईल. सरकारची ही कल्पना समजण्याच्या बाहेर आहे.

आम्ही काय दुकान बंद करुन घरी बसायचे –
राजीव बजाज यांनी सरकारला प्रश्न केला की, मी सरकारला विचारु इच्छितो की उद्या ग्राहकांनी तुमच्या मॉडेलचा स्वीकार केला नाही तर ऑटो इंडस्ट्रीचे काय होईल. म्हणजे असं की तुम्ही आयसी इंजिन बंद केले, तर या संबंधित लोकांचा नोकऱ्या जातील. इलेक्ट्रिक वाहनांची विक्री होत नसेल, अशा वेळी आम्ही काय करायचे? आम्ही काय आमचे दुकान बंद करुन घरी बसायचे?

यामुळे चीनमध्ये नोकऱ्या निर्माण करत आहोत
राजीव बजाज यांनी असे देखील सांगितले की, इलेक्ट्रिक वाहनांना प्रोस्ताहन देण्यात आपल्याला कोणतीही समस्या नाही पंरतू त्याला सर्वात चांगला पर्याय म्हणणे चूकीचे ठरेल. ते म्हणाले की इलेक्ट्रिक वाहनांना उत्तम म्हणण्यापेक्षा चांगले म्हणणे योग्य ठरेल. भारतात ९९ टक्के इलेक्ट्रिक वाहनांचे सेलर्स चीनमधून वाहने विकण्यासाठी आणत आहेत, यामुळे चीनमध्ये नोकऱ्या वाढत आहे. ते असे देखील म्हणाले की आपण इलेक्ट्रिक वाहनांसाठी चीनवर निर्भर आहोत. आपण ते व्यापारी आहोत जे चीनमधून वाहने आणून जे बाजारात विकत आहे आणि चीनला रोजगार देत आहोत.

आरोग्यविषयक वृत्त

दातांच्या समस्येवर करा  ‘हे’ घरगुती उपाय

पेरू खाल्यामुळं ‘हा’ आजार मुळापासून होतो ‘गायब’

दुधी भोपळा ‘वरदान’ ठरतयं मधुमेह, कावीळ आणि मूत्रपिंडांच्या रूग्णांसाठी, जाणून घ्या

‘व्होडका’त अनेक औषधी गुणधर्म, विविध समस्यांवर लाभदायक !

लग्नाच्या आधी HIV टेस्ट : सरकार बनवणार नवा कायदा

‘खसखस’मुळं होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

‘ही’ पथ्ये पाळून थायरॉईड अगदी ‘कंट्रोल’मध्ये आणा

‘कोथिंबीर’चं सेवन डोळयांसाठी अत्यंत फायदेमंद, जाणून घ्या

 

 

Loading...
You might also like