सर्वसामान्यांना घर ‘स्वस्त’ मिळण्यासाठी मोदी २.० सरकारकडून ‘हे’ मोठं पाऊल ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीत लक्षणीय यश मिळाल्यानंतर आता मोदी सरकार वेगाने कमला लागले असून येणाऱ्या अधिवेशनात सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा देण्याची तयारी मोदी सरकार करत असल्याची माहिती समोर येत आहे. स्वस्त दरात घर मिळण्यासाठी या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येणार आहे. या अर्थसंकल्पात गृहकर्ज घेणाऱ्या नागरिकांना सूट देण्याची तयारी सरकार करत असल्याची माहिती मिळत आहे.

यात गृहकर्जाच्या हप्त्यांच्या व्याजावरील टॅक्समध्ये सूट तसेच त्याचप्रमाणे गृहकर्जाच्या प्रिन्सिपलवर देखील सूट देण्याचा विचार मोदी सरकार करत आहे. त्याचप्रमाणे रियल एस्टेट सेक्टरला मंदीतून बाहेर काढण्यासाठी देखील सरकार गांभीर्याने विचार करत असल्याची माहिती मिळत आहे. यासाठी अर्थ मंत्रालयाने क्रेडाई कडून माहिती मागवली आहे. यामधे टॅक्समध्ये कशाप्रकारे सूट देता येईल याचा देखील विचार अर्थ मंत्रालय करत आहे. खरेतर मोदी सरकार रियल एस्टेट सेक्टरला मंदीतून बाहेर काढण्यासाठी  मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे मोदी सरकार यासाठी जोरदार प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात  टॅक्सवर सूट देण्याचा विचार सरकार करत आहे.

दरम्यान, मागील जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत स्वस्त घरांसाठी लागणाऱ्या जीएसटीमध्ये मोठ्या प्रमाणात कपात करत ती थेट १२ टक्क्यांवरून १ टक्क्यांवर आणल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला होता. त्यामुळे या अर्थसंकल्पात मोदी सरकार काय पाऊल उचलते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आरोग्य विषयक वृत्त

वीस वयानंतर मुलींच्या शरीरात होतात ‘हे’ बदल

वजन कमी-जास्त का होते? जाणून घ्या कारणे

‘हे’ शक्य आहे, योग्स आहाराने वाढते हिमोग्लोबिनचे प्रमाण

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like