‘हाउज द जोश’… संसदेत घुमला ‘उरी’ चा डायलॉग

दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारकडून आपल्या कार्यकाळातील शेवटचा अंतरिम अर्थसंकल्प शुक्रवारी मांडण्यात आला. यावेळी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी हा अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला त्यावेळी ‘उरी’ चित्रपटातील ‘हाउज द जोश’चा आवाज संसदेत घुमत होता. गोयल यांच्या भाषणादरम्यान विरोधकांनी लोकसभेत गोंधळ घातला. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपाच्या खासदारांनी जोरदार बाकं वाजवत पीयूष गोयल यांना प्रोत्साहन दिले.

पीयूष गोयल यांच्या भाषणाला सुरुवात होताच विरोधी बाकांवरील सदस्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी गोंधळ घालणाऱ्या विरोधकांना भाजपाच्या खासदारांनी विचारले, ‘हाउ इज द जोश ?’ दरम्यान, चित्रपटसृष्टीसाठी काही योजना जाहीर करताना अर्थमंत्री पियुष गोयल यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘उरी द सर्जिकल स्ट्राइक’ चित्रपटाचा उल्लेख केला.

त्यानंतर गोयल यांनी आपल्या भाषणात शेतकरी, कामगार, नोकरदार यांच्यासाठी एकामागोमाग एक घोषणा करण्यास सुरुवात केली. गोयल यांच्या प्रत्येक घोषणेचं कौतुक करत मोदी बाक वाजवत होते. त्यांचा हा मूड पाहून सत्ताधारी खासदारही जोशमध्ये आले. प्रत्येक घोषणेचं स्वागत करताना भाजप खासदारांनी ‘उरी’ चित्रपटातील ‘हाउज द जोश’ हा डायलॉग काही खासदारांनी विरोधकांकडं पाहून मारला.

Loading...
You might also like