Budget 2019 : अर्थसंकल्पात महात्मा गांधीजींचे नाव घेत ‘मोठी’ घोषणा !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प जाहीर केला. यावेळी त्यांनी अर्थसंकल्पात अनेक नवनवीन मुद्दे मांडले. विशेष म्हणजे अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी महात्मा गांधीजींचा उल्लेख करत नवी घोषणा केली. मोदी सरकारच्या स्वच्छता अभियानाची उद्दीष्टे आधीच पूर्ण झाली असा दावा करताना निर्मला सीतारमण म्हणाल्या की, महात्मा गांधींच्या पुढच्या जयंतीच्या वेळी राजघाट येथे ‘राष्ट्रीय स्वच्छता केंद्र’ उभारण्यात येणार आहे.

२ ऑक्टोबर २०१९ पर्यंत पंतप्रधानांनी देश उघड्यावर शौचमुक्त करण्याचा संकल्प केला आहे. माझा विश्वास आहे की हे २ ऑक्टोबरपूर्वीच हा संकल्प पूर्ण होईल. या प्रसंगी साजरा करण्यासाठी २ ऑक्टोबर २०१९ रोजी राजघाट येथे राष्ट्रीय स्वच्छता केंद्राचे उद्घाटन केले जाईल, असं अर्थसंकल्प सादर करताना सीतारामन यांनी सांगितलं. तसंच गांधीजींचे सकारात्मक विचारांचे मूल्य पुढे आणण्यासाठी गांधी विश्वकोष तयार करत असल्याची माहिती देखील सीतारामन यांनी यावेळी दिली.

दरम्यान, निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषण करताना देशातील किती गावे उघड्यावर शौचमुक्त झाले आहेत. देशातील ५.६ लाखांहून अधिक गाव शौचमुक्त झाले आहे. तर मोदींच्या मागील कार्यकाळापासून म्हणजे २०१४ पासून आतापर्यंत ९६ दशलक्ष शौचालय स्थापित करण्यात आले आहेत, अशीही माहिती त्यांनी दिली.

पोटाची चरबी कमी करण्यासाठी ‘या’ आयुर्वेदिक चहांचे सेवन करा

‘हार्ट अ‍ॅटॅक’ पासून दूर राहण्यासाठी आहारातील ‘हे’ पदार्थ कटाक्षाने टाळा

पावसाळ्यात पायांना पडणाऱ्या भेगांपासून ‘अशी’ घ्या पायाची काळजी

गैरहजेरीवरुन ‘सलमान’ला न्यायालयाची तंबी

…तर तुमचही नावं स्मारकं, रस्ते, शाळा, विद्यापीठ, रुग्णालयं, विमानतळांना देता येईल