Budget : अर्थमंत्री निर्मला सितारमन यांच्याकडून पाश्‍चिमात्य विचारांना ‘तिलांजली’, …म्हणून मोडली ‘परंपरा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रात मोदी सरकार पुन्हा निवडून आल्यानंतर त्यांचा पहिला अर्थसंकल्प सादर करण्यात आला. मात्र गेल्या अनेक वर्षांची असलेली ‘ब्रिफकेस’ परंपरा मोडून अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लाल मखमली कपड्यात गुंडाळलेला चोपडीच्या आकाराचा अर्थसंकल्प सादर करून पाश्चिमात्य विचारांना तिलांजली दिली. निर्मला सीतारमण अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी फोटोग्राफरना छायाचित्रे काढण्यासाठी सामोऱ्या गेल्या. तेव्हा त्यांच्या हातात वर्षानुवर्ष अर्थमंत्र्यांच्या हातात दिसणारी ‘ब्रीफकेस’ दिसत नव्हती. त्यांच्या हातात लाल मखमली कपड्यात गुंडाळलेला चोपडीच्या आकाराचा अर्थसंकल्प दिसत होता. अर्थसंकल्पावर सोनेरी रंगातील अशोकस्तंभही ठळकपणे दिसत होता.

ब्रीफकेसमधून अर्थसंकल्प आणायचा आणि तो सदनासमोर सादर करायचा ही परंपरा वर्षानुवर्ष चालत आली होती, जी निर्मला सीतारमण यांनी मोडली आहे. असे का केले हा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. अर्थखात्याचे मुख्य आर्थिक सल्लागारांनी या प्रश्नाचे उत्तर दिले आहे, पाश्चिमात्य विचारांच्या गुलामीतून बाहेर पडत असल्याचे हे प्रतीक असल्याचे कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांनी सांगितले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आर.के.षण्मुगम यांनी पहिला अर्थसंकल्प सादर केला होता. २६ नोव्हेंबर १९४७ साली तत्कालीन अर्थमंत्र्यांनी चामड्याच्या बॅगेतून अर्थसंकल्प आणला होता. त्यानंतर हळूहळू ब्रीफकेसमधून अर्थसंकल्प आणण्यास सुरुवात झाली. जी आता अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोडून पाश्चिमात्य विचारांना तिलांजली देऊन नवीन पायंडा पाडला आहे.

पावसाळ्यात केसांची विशेष काळजी घ्या, कारण …

पावसाळ्यात मक्याचं कणीस खाण्याचे अनेक फायदे

पावसाळ्यात येणारी ‘ही’ भाजी आहे सर्वात पौष्टिक ; खा आणि रोगमुक्त व्हा

पावसाळ्यात माशांमुळे पसरू शकते रोगराई, असा टाळा उपद्रव

‘या’ कारणामुळे पावसाळ्यात ‘डोळ्यांच्या समस्या’ निर्माण होतात

य़ेरवडा कारागृहात टोळीयुद्ध जोमात, नक्की चाललंय तरी काय ?

महाआघाडीच्या अडचणीत वाढ,वंचितनंतर ‘हा’ पक्षही देणार धक्का ?