Budget 2019 : भारतीय पासपोर्ट असणाऱ्या अनिवासी भारतीयांना ‘आधारकार्ड’ मिळणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०१९-२० सालचे अर्थसंकल्प सादर करताना अनिवासी भारतीयांसाठी (एनआरआय) देखील एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ज्या अनिवासी भारतीयांकडे पासपोर्ट आहे अशा सर्वांना सरकार आता आधार कार्ड देणार आहे. सरकारने एक योजना आणण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. ज्यानुसार भारतीय पारंपारिक कामगारांना आणि त्यांच्या उत्पादनांना जागतिक बाजारात नेण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यासाठी आवश्यकता असेल त्यानुसार पेटंट आणि भौगोलिक सांकेतांकांचा वापर केला जाईल.

४ नवीन दूतावासांची स्थापना करणार :
अर्थमंत्र्यांनी सांगितले की, ‘आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा वाढता प्रभाव आणि नेतृत्वात मजबुती आणण्यासाठी सरकारने ४ नवीन दूतावास स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. हे दूतावास अशा ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहेत जेथे आत्तापर्यंत भारताचे कोणतेही राजनैतिक पोहोच अथवा प्रकल्प नाही. आर्थिक वर्ष २०१९-२० साली सरकार ४ नवीन दूतावास स्थापन करेल ज्याने विदेशातील भारताच्या प्रभाव आणि विस्तार वाढेल तसेच तेथील स्थानिक भारतीय जनतेला सरकार चांगली सेवा पुरवू शकेल.’

मार्च २०१८ मध्ये सरकारने आफ्रिकेमध्ये १८ नवीन भारतीय दूतावास स्थापन करण्याला मंजुरी दिलेली होती. त्यांपैकी आर्थिक वर्ष २०१८-१९ दरम्यान रवांडा, इक्वेटेरियल ग्वीनिया, ग्वीनिया गणराज्य, बुरकीना फासो, आणि डिजिबाऊंटी अशा एकूण ५ ठिकाणी भारतीय दूतावास यशस्वीरीत्या उघडले आहेत. याशिवाय यावर्षी ४ नवीन दूतावास उघडण्यासाठी सरकार मंजुरी देण्यात येईल.

जाणून घ्या ‘अगस्ता वनस्पती’चे औषधी फायदे

पोटाची चरबी कमी करण्यासाठी ‘या’ आयुर्वेदिक चहांचे सेवन करा

‘हार्ट अ‍ॅटॅक’ पासून दूर राहण्यासाठी आहारातील ‘हे’ पदार्थ कटाक्षाने टाळा

पावसाळ्यात पायांना पडणाऱ्या भेगांपासून ‘अशी’ घ्या पायाची काळजी

घुसमट झाल्यामुळेच ‘वंचित’ मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला : लक्ष्मण माने

RSS आणि भाजपविरोधातील लढ्याचा जोश दहापटीने वाढेल