Budget 2019 : लहान ‘दुकानदार’, व्यवसायिकांना मिळणार ३००० रुपयांची ‘पेंशन’, जाणून घ्या नोंदणी प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थ संकल्प सादर केल्यानंतर त्यात छोट्या व्यवसायिकांसाठी आणि दुकानदारांसाठी खास निर्णय घेतला आहे. त्यांच्यासाठी मोदी सरकारने पेंशन योजनेची घोषणा केली आहे. या योजने अंतर्गत ३ कोटी लहान दुकानदारांना आणि व्यवसायिकांना पेेंशन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पेेंशनचा लाभ ते लहान दुकानदार घेऊ शकतील ज्यांचे वार्षिक उत्पन्न १.५ कोटी पेक्षा कमी आहे. यासाठी त्यांना नोंदणी देखील करावी लागेल.

३,००० रुपये पेंशन –

या पेंशन योजने अंतर्गत लहान व्यवसायिक, दुकानदार आणि स्वयंरोजगार करणाऱ्या लोकांचा सहभाग असेल. ६० वर्षांनंतर त्यांना या योजने अंतर्गत ३००० रुपयांपर्यंत पेंशन मिळू शकते. पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाने बैठकीत हा निर्णय घेऊन निवडणूकीत दिलेले आश्वासन पुर्ण करण्यात आले आहे.

अशी करता येईल नोंदणी –

१८ ते ४० वयोगटातील लोक या योजनेचा फायदा घेऊ शकतात. या पेंशन योजनेत नोंदणी करण्यासाठी नागरी सुविधा केंद्रात करता येईल. योजनेचा लाभ घेण्यासाठी खूप साधे नियम बनवण्यात आले आहे. यासाठी फक्त आधार कार्ड आणि बँक खात्याची आवश्यकता असेल. लघू उद्योगांसाठी मोदी सरकारने ३५० कोटी रुपये दिले आहेत. तसेच लहान व्यापाऱ्यांना ५९ मिनिटात कर्ज मिळेल. याची व्यवस्था करुन दिली आहे.

पावसाळ्यात केसांची विशेष काळजी घ्या, कारण …

पावसाळ्यात मक्याचं कणीस खाण्याचे अनेक फायदे

पावसाळ्यात येणारी ‘ही’ भाजी आहे सर्वात पौष्टिक ; खा आणि रोगमुक्त व्हा

पावसाळ्यात माशांमुळे पसरू शकते रोगराई, असा टाळा उपद्रव

‘या’ कारणामुळे पावसाळ्यात ‘डोळ्यांच्या समस्या’ निर्माण होतात

य़ेरवडा कारागृहात टोळीयुद्ध जोमात, नक्की चाललंय तरी काय ?

महाआघाडीच्या अडचणीत वाढ,वंचितनंतर ‘हा’ पक्षही देणार धक्का ?