पाणीबाणी ! संकट दूर करण्यासाठी अर्थसंकल्पात पाण्यासाठी ‘भरीव’ तरतूद !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मान्सूनच्या कमतरतेचा परिणाम देशाच्या अर्थसंकल्पावर झाल्याचे देखील दिसत आहेत, याचमुळे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात घरोघरी पाणी पोहचवण्याबाबत आणि पाणी साठवण्याबाबत मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. देशातील पाणी संकट दूर करण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात मोठी घोषणा होऊ शकते. नीरांचल योजनेअतंर्गत निधीचे वाटप वाढवण्याची शक्यत आहे. याशिवाय प्रत्येक घरात जल योजना यासाठी रक्कम वाढवली जाऊ शकते.

सरकारचे 2024 पर्यंत घरोघरी पाणी पोहचवण्याचा सराकारचा मानस आहे. नीति आयोगाने देशातील पाणी संकटावर दिलेल्या आहवालात देशासाठी धोकादायक असल्याचा अलार्म आहे. या आहवालात 2030 पर्यंत देशातील 40 टक्के लोकांना पिण्यासाठी पाणी नसेल. यात दिल्ली, बंगळुरू, चेन्नई आणि हैदराबाद याशिवाय देशातील 21 शहरांचा समावेश आहे.

देशातील पाणी संकट दूर करण्यासाठी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. यासाठी महाराष्ट्रातील जलयुक्त शिवार अभियानांअंतर्गत ही खास योजना राबवली जाऊ शकते. राजस्थान आणि तेलंगणा या राज्यातील योजनांवर देखील यावेळी चर्चा करण्यात आली आहे.

काय आहे नीरांचल योजना –
भारत सरकारने नुकतीच नीरांचल राष्ट्रीय वाटरशेट परियोजनेसाठी जागतिक बँकेबरोबर कर्ज घेऊन करार केला आहे. ज्यावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. ही योजना ग्रामीण विकास मंत्रालायाद्वारे 6 वर्षाच्या (2016 – 21) अवधित लागू करण्यात येईल.

नीरांचल योजनेचे बजेट 2142 कोटी –
यामुळे जल विज्ञान आणि जल प्रबंधन, कृषि उत्पादन प्रणाली, क्षमता निर्माण यामुळे पंतप्रधान कृषि सिंचाई योजनेला मदत मिळेल. नीरांचल योजनेला मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये मंत्रिमंडळाने मंजूरी दिली होती. या योजनेचे एकूण बजेट 2142 कोटी रुपये आहे. ज्यात 1071 कोटी रुपयांंच्या सरकारी हिस्सा आहे तर उरलेला 50 टक्के जागतिक बँकेचा हिस्सा असेल.

महिलांनी पालेभाज्या खाल्ल्या तर नेहमी राहतील फिट

वजन खूपच कमी आहे का ? मग ‘हा’ आहार तुमच्यासाठी आहे फायदेशिर

नवाजुद्दीनच्या चित्रपटामध्ये मौनी रॉय ऐवजी येणार ही ‘अभिनेत्री’

‘धडकन’मधील ‘देव’ची मुलगी आथियाला स्टार क्रिकेटर केएल राहूल करतोय ‘डेट’

मराठा आरक्षण : राज्यामध्ये मिळाले आता केंद्राच्या नोकऱ्यांमध्येही लागू झाले पाहिजे : आमदार हर्षवर्धन जाधव