Budget 2019 : ‘या’ 5 महत्वाच्या गोष्टींमुळे सर्वसामान्यांना ‘दिलासा’, तर ‘या’ गोष्टी महागणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात अनेक नवीन निर्णय घेतले गेले असून त्यामुळे अर्थव्यवस्थेत अनेक बदल होण्याचे चिन्हे आहेत. काही दैनंदिन गोष्टींवर ग्राहकांना दिलासादायक असे निर्णय सरकारने घेतले आहेत. त्यातील ठळक असे पाच मुद्दे पुढीलप्रमाणे :

१. ४५ लाख रुपयांपर्यंतच्या होम लोन वरील आयकराच्या सुटीची सीमा वाढून ती आता ३.५ लाख इतकी झाली आहे. याआधी हि सीमा २ लाख इतकी होती.

२. देशात १२० कोटींपेक्षा अधिक लोकांकडे आधार कार्ड आहेत. ज्यांच्याकडे पण कार्ड नाही ते आता आधारकार्ड द्वारेदेखील इन्कम टॅक्स रिटर्न भरू शकणार आहेत.

३. रोखीत होणारे व्यापारी व्यवहार थांबविण्यासाठी एकाच बँक खात्यातून एका वर्षात १ कोटींपेक्षा जास्त रक्कम काढल्यास २% टीडीएस लागणार आहे.

४. इलेकट्रीक वाहन खरेदी करण्यासाठी जर तुम्ही कर्ज घेतले असेल तर त्याचे व्याज भरल्यानंतर तुम्हाला १.५ लाखांची अतिरिक्त सूट मिळणारआहे.

५. जे नागरिक स्टार्टअप टॅक्स डिक्लेरेशन फाइल करून कर भरण्यास नवयाने सुरुवात करतील त्यांच्या संपत्तीसंदर्भात आयकरविभाग कोणत्याही प्रकारची चौकशी करणार नाही.

त्याचबरोबर खालील ‘या’ गोष्टी मात्र आता महागणार आहेत :
व्हिडिओ रेकॉर्डर
मार्बल
ऑटो पार्ट्स
सीसीटीव्ही कॅमेरा
मेटल फिटिंग
आयात केलेली पुस्तके
सोने