Budget 2019 : महिलांना ‘या’ ३ सवलती मिळणार, ‘टॅक्स’मध्येही सवलत ?

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था – केंद्र सरकार नोकरीला जाणाऱ्या महिलांना दिलासा देण्याच्या प्रयत्नात आहे. हा निर्णय नोकरी करणाऱ्या महिलांच्या उत्पन्नाला फायदेशीर ठरु शकतो. नोकरी करणाऱ्या महिलांना टॅक्समधून सूट देण्याचा विचार मोदी सरकार करत आहे. ५ जुलैला सादर करण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन महिलांना दिलासा देऊ शकतात. शैक्षणिक कर्जातील व्याजावर टॅक्सची वेळीची सीमा हटवली जाऊ शकते.

नोकरदार महिलांच्या मुलांसाठी सवलत –

अर्थसंकल्पात महिलांना टॅक्सवर सूट मिळू शकते, नोकरी करणाऱ्या महिलांच्या मुलांच्या ‘क्रेच फिस’मध्ये टॅक्सवर सूट मिळण्याची शक्यता आहे. क्रेच फी वरील सूट ही ७५०० रुपयांपर्यंत असेल. ही टॅक्सवरील सूट महिलेच्या २ मुलांना मिळून देण्याचा विचार सुरु आहे.

मोदी सरकारने मागील अर्थसंकल्पात घोषणा केली होती की महिलांना बँकेतून ४० हजार रुपयांपर्यंतच्या व्याजात टॅक्स लागणार नाही. म्हणजे जर महिला बँकेतून ४० हजारापर्यंत व्याज मिळवत असेल तर त्यांना TDS लागणार नाही.

मागील अर्थसंकल्पात सरकारने गर्भवती महिलांसाठी पंतप्रधान मातृ योजनेची घोषणा दिली होती. ज्यात महिलांना २६ आठवड्यासाठी बाळाची काळजी घेण्यासाठी सुट्टी मिळेल. तसेच सरकारने रोजगार करणाऱ्याच्या व्यक्तीच्या मृत्यू नंतर २.५ लाख रुपये देण्याच्या बदल्यात ६ लाख मदत देण्याची घोषणा केली होती. ग्रेच्युटीची सीमा वाढवून १० लाखावरुन सरकारने २० लाख रुपये केले होते.

Video : अभिनेत्री करिना कपूरच्या ‘या’ बोल्ड व्हिडीओने वाढवलं इंटरनेटच ‘तापमान’

नात्याचा स्विकार केल्यानंतर अर्जून कपूर – मलायकाचे फोटो सर्वांसमोर

भावाच्या खुनप्रकरणी शिक्षा झालेल्यांकडून दलित तरुणाला भररस्त्यात बेदम मारहाण

खर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रात निवासी वैद्यकीय अधिकारी नेमण्याची भारिपकडून मागणी

दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी ‘हा’ व्यायाम करा