होम लोनच्या व्याजावरील सुट 2 लाखाहून 5 लाखापर्यंत करावी : CII

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील आघाडीची उद्योग संस्था भारतीय उद्योग परिसंघ (CII) ने गृह खरेदीदारां (Home Buyers) ना अर्थसंकल्पात (Budget 2020) जादा कर देण्याचे आवाहन केले आहे. उद्योग मंडळाने सांगितले की रोख संकटाला सामोरे जाणाऱ्या रिअल इस्टेट क्षेत्रा (Real Estate Sector) तील मागणी वाढवण्यासाठी आगामी अर्थसंकल्पात गृह खरेदीदारांना मिळणारा कराचा लाभ वाढविण्यात यावा, असं उद्योग मंडळानं म्हटलं आहे.

सीआयआय ने सांगितलं की जीडीपी विकास दर ६ ते ७ टक्क्यांपर्यंत पोहोचण्यासाठी गृहनिर्माण क्षेत्रात मागणी वाढविण्यासाठी चांगल्या योजना आणणे हे फार महत्वाचे आहे. उद्योग संघटनेनं प्रधानमंत्री आवास योजना (Pradhan Mantri Awas Yojana) अंतर्गत घर खरेदीदारांसाठी निश्चित उत्पन्न मर्यादा वाढविण्याचा आग्रह केला आहे.

पंतप्रधान आवास योजनेंतर्गत उत्पन्नाची मर्यादा वाढण्याचे आवाहन
उद्योग मंडळाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रिअल इस्टेट क्षेत्राने सरकारकडून रोख आधार उपलब्ध करून देण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. यासह, मागणी वाढविण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. निवेदनानुसार, गेल्या काही वर्षांपासून रिअल इस्टेट क्षेत्रावर दबाव आहे. यासह रिअल इस्टेट क्षेत्रालाही रोख रकमेची समस्या भेडसावत आहे. अशा परिस्थितीत सीआयआय सरकारकडून घर खरेदी करणाऱ्यांना कराचा लाभ वाढवून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत उत्पन्नाची मर्यादा वाढवण्याचे आवाहन करत आहे.

गृह कर्जावरील व्याज सूट देण्याची मर्यादा ५ लाखांपर्यंत वाढविण्यात यावी
उद्योग मंडळाने अर्थसंकल्पापूर्वी आपल्या सूचनांमध्ये म्हटले आहे की रिअल इस्टेट क्षेत्राला चालना देण्यासाठी कृती आराखडा आवश्यक आहे. सीआयआयच्या निवेदनात असे म्हटले आहे की, गृह कर्जावरील देय व्याजावर जास्तीत जास्त कराची सूट २,००,००० रुपयांवरून ५,००,००० रुपयांपर्यंत वाढविण्यात यावी. तसेच पंतप्रधान आवास योजनेंतर्गत एमआयजी-१ आणि एमआयजी-२ श्रेणीसाठी पात्रतेचे निकष सध्याच्या १२ आणि १८ लाख रुपयांवरून १८ आणि २५ लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचा विचार केला पाहिजे.

सीआयआय ने सांगितलं की, ‘या योजनेचा फायदा समाजातील मोठ्या वर्गाला होणार आहे आणि मागणी देखील वाढेल.’ या व्यतिरिक्त, उद्योग मंडळानं एकात्मिक टाउनशिप आणि गृहनिर्माण क्षेत्राला पायाभूत सुविधा देण्याची मागणी केली. यामुळे कंपन्यांना कमी किंमतीत कर्ज मिळू शकेल.

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like