बजेटमुळे निराश झाला शेयर बाजार ! 162 मिनिटाच्या भाषणाने गुंतवणुकदारांचे बुडवले 3.6 लाख करोड रूपये

मुंबई : पोलिसनामा ऑनलाइन – मोदी सरकारच्या दुसर्‍या कार्यकाळातील बजेटने शेयर बाजाराला निराश केले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट सादर केले. अर्थमंत्र्यांनी इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये बदल केले. सोबतच कंपन्यावर डीडीटी संपुष्टात आणण्याची घोषणाही केली. गुंतवणुकदारांना एलटीसीजी आणि एसटीटीबाबत अपेक्षा होती, परंतु याची घोषणा न झाल्याने शेयर बाजाराचा मूड बिघडला. ज्यामुळे शेयर बाजार मोठ्या घसरणीसह बंद झाला. शेवटच्या टप्प्यात सेंसेक्स 988 अंकाने घसरून 39,735.53 च्या स्तरावर बंद झाला. तर, निफ्टी 318 अंकाने घसरून 11,644 च्या स्तरावर बंद झाला. बाजारातील घसरणीमुळे गुंतवणुकदारांना 3.60 लाख करोड रुपयांचा फटका बसला.

बाजारात मागील 10 बजेटच्या तुलनेत सर्वात मोठी घसरण दिसली. मोदी सरकारच्या मागील 6 पैकी 4 पूर्ण बजेटच्या दिवशी शेयर बाजार घसरणीत राहिला आहे. तर मागच्या वर्षी 1 फेब्रुवारीला अंतरिम बजेटच्या दिवशी सेंसेक्स 0.6% फायद्यात राहिला होता. बजेटच्या दिवशी सेक्टरशी संबधित घोषणा झाल्यानंतर त्या सेक्टरमधील कंपन्यांच्या शेयरमध्ये चढ-उतार होतो.

गुंतवणुकदारांचे 3.6 लाख करोड रूपये बुडाले
अर्थमंत्र्यांच्या बजेटने गुंतवणुकदारांना निराश केले. बजेटच्या दिवशी बाजार घसरल्याने गुंतवणुकदारांना मोठा धक्का बसला. शनिवारी गुंतवणुकदरांचे 3.6 लाख करोड रुपयांचे नुकसान झाले आहे. शुक्रवारी बंद भावावर बीएसईवर लिस्टेड एकुण कंपन्यांचे मार्केट कॅप 1,56,50,981.73 करोड रुपये होते, जे आज 3,62, 228.51 करोड कमी होऊन 1,52,88,753.22 करोड रुपये झाले.

बीएसईच्या मिडकॅप इंडेक्समध्ये 2.21 टक्के घसरण आणि स्मॉल कॅप इंडेक्समध्ये 2.20 टक्क्यांची घसरण नोंदली गेली. तर निफ्टीच्या सेक्टर इंडेक्समध्ये मेटल इंडेक्समध्ये 3.43 टक्क्यांची कमजोरी, पीएसयू बँक इंडेक्समध्ये 4.04 टक्के कमजोरी, प्रायव्हेट बँक इंडेक्समध्ये 3.09 टक्क्यांची कमजोरी दिसून आली. तर रियल्टी इंडेक्समध्ये 8.16 टक्क्यांची मोठी घसरण दिसून आली. निफ्टीच्या सेक्टर इंडेक्समध्ये केवळ आयटी इंडेक्स हिरव्या निशाणीवर बंद झाला. ज्यामध्ये 0.81 टक्क्यांची वाढ दिसून आली.

यापूर्वी, आजच्या व्यवसायात सेंसेक्समध्ये 250 अंकापेक्षा जास्त घसरण झाली आहे. आणि तो 40500 च्या स्तराच्या खाली गेला. तर, निफ्टीमध्ये सुमारे 60 अंक घसरून 11900 च्या खाली गेला. यापूर्वी सुद्धा गुरूवारी आणि शुक्रवारी शेयर बाजारमध्ये मोठी घसरण दिसून आली होती.

का उघडला बाजार
न्यूज एजन्सीने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, शेयर बाजारशी संबंधित लोकांच्या आवाहनानंतर हा निर्णय घेण्यात आला, कारण बजेटच्या घोषणांमुळे बाजारात मोठी चढ-उतार होत असते. 2015 मध्येसुद्धा बजेटच्या दिवशी शनिवार असतानाही बीएसईवर ट्रेडिंग झाले होते. सामान्यपणे शनिवार-रविवारी शेयर बाजार बंद असतो.

परदेशी गुंतवणूक वाढविण्यासाठी असू शकतो निर्णय
आजच्या बजेटमध्ये आयकर आणि शेयर बाजारशी संबंधित मोठ्या घोषणांची अपेक्षा केली जात होती. सरकार खासगी आणि परदेशी गुंतवणुकीला चालना देण्यासाठी घोषणा करू शकते. देशाची तिमाही जीडीपी ग्रोथ 6 वर्षातील सर्वात खालच्या स्तरावर आहे. सरकारने वार्षीक ग्रोथ 5 टक्के राहण्याचा अंदाज जारी केला आहे. ही 11 वर्षातील सर्वात कमी असेल.

अशियाई आणि अमेरिकन बाजारात घसरण
अशियाई बाजारात आज एसजीएक्स निफ्टी 47 अंक म्हणजे 0.39 टक्क्यांच्या कमकुवतीसह 11,940.00च्या स्तारावर होता. तिकडे युएस मार्केटमध्ये मोठी घसरण दिसून आली. अमेरिकन मार्केटवर कोरोना वायरसच्या भितीचे सावट दिसून येत आहे. कालच्या व्यवसायात डाओ जान्स 2 टक्क्यांपेक्षा जास्त घसरला आहे. ऑगस्टनंतर कालचा दिवस खराब ठरला. अमेरिकेने चीनहून येणार्‍या प्रवाशांवर बंदी आणली आहे. अमेरिकेतसुद्धा कोरोना वायरसची 7 प्रकरणे समोर आली आहेत.