…म्हणून आता एअरपोर्टवर ड्युटी फ्री स्टोरमध्ये मद्याची एकच ‘बाटली’ मिळणार !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – विमानतळांवरील ड्यूटी फ्री स्टोअरमधून आता केवळ मद्याची एकच बाटली खरेदी करता येणार आहे. सरकार गैर आवश्यक वस्तूंची आयात कमी करण्यासाठी हे निर्बंध लागू करण्याचा विचार करत आहे अशी माहिती समोर आली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वाणिज्य मंत्रालयाकडून 1 फेब्रुवारीला सादर केल्या जाणाऱ्या बजेटला लक्षात घेऊन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना अशा प्रकारचा प्रस्ताव देण्यात आला आहे. मंत्रालयाने ड्युटी फ्री कक्षेतून एक डब्बा सिगरेटच्या खरेदीला बंदी करण्याबाबतचा सल्ला देखील अर्थमंत्र्यांना दिला आहे. आतपर्यंत परदेशातून आलेले प्रवासी विमानतळावर अशा प्रकारच्या ड्युटी फ्री स्टोअर मधून दोन लिटर मद्य आणि एक सिगारेटचे कार्टन खरेदी करू शकत होते.

एक लिटर मद्य खरेदीसाठीच मंजुरी
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अद्यापही अनेक देश आंतरराष्ट्रीय प्रवाशांना जास्तीत जास्त एक लिटर मद्य खरेदी करण्यास परवानगी देतात आणि भारतही त्याचा अवलंब करु शकतो. सध्या सरकार देशातील अनावश्यक वस्तूंची आयात कमी करण्यासाठी विविध उपायांवर विचार करीत आहे. या अनावश्यक वस्तूंची आयात केल्याने देशाचे व्यवसायिक नुकसान होते, असा सरकारचा दावा आहे.

50 हजार रुपयांची खरेदी केल्यावर इंपोर्ट ड्युटी द्यावी लागत नाही
परदेशी नागरिक ड्युटी फ्री दुकानात 50 हजार रुपयांची खरेदी करू शकतो ज्यावर त्याला कोणताही आयात शुल्क द्यावा लागत नाही.

या सामानांवर वाढू शकतो कस्टम शुल्क
सूत्रांचे म्हणणे आहे की, वाणिज्य मंत्रालयाने मेक इन इंडियाला चालना देण्यासाठी आणि उत्पादन वाढीस वेगवान करण्यासाठी आगामी बजेटमध्ये कागद, पादत्राणे, रबर वस्तू आणि खेळणी इत्यादीवरील सीमा शुल्क वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

मंत्रालयाने फर्निचर, रसायन, रबर, कोटेड कागद आणि पेपर बोर्ड सारख्या अनेक वेगळ्या 300 हुन अधिक वस्तूंचे आयात शुल्क दर त्या त्या वस्तूप्रमाणे वाढवण्याचा प्रस्ताव दिला आहे.

फेसबुक पेज लाईक करा –