पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी ! अर्थसंकल्पात टॅक्समध्ये सूट वाढवुन 50 हजारांपर्यंत होऊ शकते, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निवृत्तीवेतनातून मिळणार्‍या मासिक उत्पन्नात 2020 च्या अर्थसंकल्पात सरकार मोठा दिलासा देणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार कामगार मंत्रालयाने अर्थ मंत्रालयाकडे यासंबंधित प्रस्ताव पाठविला असून यानुसार सध्याची सूट मर्यादा 15,000 रुपयांवरून 50,000 रुपयांपर्यंत वाढविण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. मासिक पेन्शनमधून मिळणारे उत्पन्न इतर उत्पन्नाच्या स्त्रोताखाली येते आणि करपात्र आहे. यावर, 50 हजार रुपयांचा स्टॅंडर्ड डिडक्शन लाभही उपलब्ध नाही. कामगार मंत्रालयानुसार, हे भेदभावपूर्ण आहे. पेन्शनधारकांना लाभ दिल्यास ते अधिक चांगले होईल. यामुळे अर्थ मंत्रालयावर फारसा बोजा पडणार नाही. सरकार या प्रस्तावावर विचार करीत असून कदाचित या वेळी अर्थसंकल्पात ही सवलत जाहीर करण्याची शक्यता आहे.

आयकर स्लॅबमध्ये मोठा बदल :
त्याशिवाय 1 फेब्रुवारी रोजी सादर झालेल्या अर्थसंकल्पात आयकरमध्येही मोठे बदल होऊ शकतात. माहितीनुसार वर्षाकाठी 7 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर 5% कर प्रस्तावित आहे. सध्या वार्षिक 5 लाखांपर्यंत उत्पन्न मिळविण्यावर 5% कर आकारला जातो. त्याचबरोबर 7 ते 10 किंवा 12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर 10 टक्के कर प्रस्तावित आहे. सध्या 5 ते 10 लाख रुपयांच्या उत्पन्नात 20% कर आकारला जातो.

10 ते 20 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 20 टक्के कर प्रस्तावित आहे. सध्या दहा लाखाहून अधिक उत्पन्न मिळविण्यावर 30 टक्के कर आकारला जातो. 20 लाख ते दहा कोटी रुपयांच्या उत्पन्नावर 30 टक्के कर प्रस्तावित आहे. याशिवाय 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळविण्यावर 35 टक्के कर प्रस्तावित आहे.

फेसबुक पेज लाईक करा –