मध्यमवर्गीयांसाठी खुशखबर ! इन्कम टॅक्समध्ये लवकरच मिळू शकते मोठी सूट, ‘एवढ्या’ लाखाची कमाई होणार Tax Free

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकार 1 फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प सादर करेल. अशी शक्यता वर्तवली जात आहे की अर्थमंत्री निर्मला सीतारमन या अर्थसंकल्पामध्ये आयकरात मोठी सूट देण्याची घोषणा करु शकतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वर्षाला 7 लाख रुपयांचे उत्पन्न कमावणाऱ्यांना 5 टक्के आयकर लावण्याचा प्रस्ताव आहे. सध्या 5 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर 5 टक्के आयकर आकारला जातो. तर 7 ते 10 किंवा 12 लाख रुपये उत्पन्न असलेल्यांकडून 10 टक्के आयकर आकरण्याचा प्रस्ताव आहे. सध्या 5 ते 10 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्याकडून 20 टक्के आयकर आकारला जात आहे.

20 लाखापर्यंत उत्पन्न मिळवणाऱ्यांना मिळणार आयकरात सूट 
वर्षाला 7 ते 10 लाख रुपये उत्पन्न असलेल्यांकडून 10 टक्के आयकर आकारला जाऊ शकतो. तर 10 ते 20 लाख रुपये उत्पन्न असलेल्यांकडून 20 टक्के आयकर आकारण्याचा प्रस्ताव आहे. तसेच 20 लाख ते 10 कोटी रुपये उत्पन्नावर 30 टक्के आयकर आकारला जाऊ शकतो. 10 कोटी पेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांकडून 35 टक्के आयकर आकारण्याचा प्रस्ताव आहे.

आयकरात सूट मिळाल्यास तुम्हाला होणार हा फायदा 
जर सरकार आयकरात सूट देण्याचा घोषणा करते तर उत्पन्नधारांकडे खर्च करण्यालायक जास्त पैसा राहीलं. म्हणजेच, वर्षाला 10 लाख रुपये उत्पन्नधारकांकडे 60,000 रुपये, 15 लाख उत्पन्नधारकांकडे 1.1 लाख रुपये आणि 20 लाख उत्पन्नधारकांकडे 1.6 लाख रुपयांचा फायदा होईल. यात सेस जोडण्यात आलेला नाही. उच्च मध्यम वर्गीय आणि मध्यमवर्गीयांच्या पैशांची बचत होईल त्यामुळे गुंतवणूक वाढेल. करात कपात झाल्याने बाजारात तेजी येईल. काहींचे म्हणणे आहे की या निर्णयाचा फार काही फायदा होणार नाही. तसेच हा काही योग्य पर्याय नाही.

फेसबुक पेज लाईक करा –