खुशखबर ! म्यूचुअल फंडाव्दारे कमाई करणार्‍यांना ‘टॅक्स’मध्ये मिळू शकतो मोठा दिलासा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अर्थसंकल्प 2020 संबंधित एक मोठी बातमी आहे. गेल्या दोन वर्षांपासून इक्विटी मार्केट ज्या लॉंग टर्म कॅपिटल गॅस टॅक्स म्हणजेच LTCG मुळे त्रस्त आहे त्यात यंदाच्या बजेटमुळे चांगला दिलासा मिळू शकतो. मिळालेल्या माहितीनुसार, सरकार बजेटमध्ये काही अटीनुसार LTCG चा दर झिरो करू शकतात.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बजेटमध्ये LTCG मोठी सवलत दिल्यास सरकार इक्विटी आणि नॉन-इक्विटी उत्पादनांवर मोठा दिलासा देऊ शकते. बजेटमध्ये एमएफ, व्हेंचर कॅपिटल, रिअल इस्टेटला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, LTCG बाबतची अर्थसंकल्पात मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यासाठी मसूदा देखील तयार करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, LTCG Tax नुसार एका वर्षांची मर्यादा वाढून तीन वर्षांपर्यंत करण्याचा विचार सुरु आहे. एका वर्षांपर्यंत केवळ 15 % LTCG ची तरतूद होऊ शकते. एक ते तीन वर्षांपर्यंत 10 % LTCG ठेवला जाऊ शकतो आणि एक लाखांपर्यंतची कमाई टॅक्स फ्री करता येऊ शकते. तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी LTCG न लावण्याचा देखील निर्णय घेतला जाऊ शकतो.

फेसबुक पेज लाईक करा –