NSC – PPF मध्ये पैसे गुंतवणार्‍यांना होणार फायदा ! अर्थसंकल्पात होऊ शकते यासंदर्भातील घोषणा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – १ फेब्रुवारी २०२० रोजी सादर होणाऱ्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण नोकरदारांना मोठा दिलासा देऊन प्राप्तिकर कायद्याच्या कलम ८० सी बदल करू शकतात. एका वृत्तानुसार, ८० सी अंतर्गत सूट देण्याची व्याप्ती अडीच लाखांपर्यंत वाढवता येऊ शकते. सध्या ही सूट दीड लाख रुपये आहे. तसेच दरमहा कापल्या जाणार्‍या ईपीएफचादेखील यात समावेश आहे.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की पीपीएफची मर्यादा दीड लाखांवरून अडीच लाख रुपयांपर्यंत वाढल्यास बचत मोठ्या प्रमाणात वाढेल. कर सवलत देण्यासाठीच्या इतर उपायांच्या तुलनेत वैयक्तिक बचतीवर याचा अधिक परिणाम होईल. देशातील ३ कोटीहून अधिक नोकरदारांचे एकूण उत्पन्न ५ लाख किंवा त्याहून अधिक आहे.

कराची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय घेतला जाणार?
वित्त मंत्रालयाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ८० सी विभागांतर्गत वेगळी सुट दिली जाऊ शकते. यासाठी राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी) अंतर्गत ५०,००० रुपयांपर्यंतच्या गुंतवणूकीला सुट मिळू शकते. याशिवाय सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) मधील गुंतवणूकीची कमाल मर्यादा अडीच लाख रुपयांपर्यंत वाढवता येऊ शकते.

सेक्शन ८० सी मध्ये आता दीड लाख रुपयांची सूट मिळते. त्यात पीपीएफ आणि एनएससीमध्ये केलेल्या गुंतवणूकीचा समावेश आहे.

अर्थ मंत्रालय छोट्या बचत योजनांवर (पीपीएफ आणि एनएससी) कर प्रोत्साहन देण्याच्या प्रस्तावावर विचार करीत आहे. यावर जर काम केले गेले तर अर्थसंकल्पात त्याचा समावेश करता येईल. आर्थिक वर्ष २०१८ मध्ये भारतीय घरगुती क्षेत्राचा बचत दर जीडीपीच्या १७.२ टक्क्यांपर्यंत आला आहे, जो २०१२ या आर्थिक वर्षात २३.६ टक्क्यांवरून खाली आला आहे.

फेसबुक पेज लाईक करा –