‘या’ वित्तमंत्र्यांनी सर्वाधिक अर्थसंकल्प केले सादर अन् बनवलं ‘रेकॉर्ड’, 2 वेळा ‘बर्थडे’ 29 फेब्रुवारीला संसदेत ‘बजेट’ सादर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आर्थिक वर्ष 2020-21 चा अर्थसंकल्प शनिवारी(दि. 1 फेब्रुवारी) सादर केला जाणार आहे. यावेळीही अर्थमंत्री निर्मला सीतारमण बजेट सादर करणार आहेत. हे दुसरं बजेट असणार आहे. 2019चं बजेटदेखील निर्मला सीतारमण यांनी सादर केलं होतं. मोदी सरकारच्या कार्यकाळातील हे दुसरं बजेट आहे. यावेळीही लोकांना बजेटकडून खूप अपेक्षा आहेत. बजेट केवळ आर्थिक धोरणांमुळेच नाही तर अर्थमंत्र्यांमुळेही चर्चेत असतं. भारतीय बजेटची स्टोरीही अशीच काहीशी आहे. यात एक नाव आहे ते म्हणजे मोरारजी देसाई. मोरारजी देसाई असे अर्थमंत्री आहेत ज्यांनी सर्वाधिक वेळा बजेट सादर केलं आहे. याव्यतिरीक्त त्यांच्या नावावर अनेक रेकॉर्ड आहेत.

मोरारजी देसाईंच्या नावे रेकॉर्ड
मोरारजी देसाई हे एकमेव माजी पंतप्रधान आहेत ज्यांनी सर्वाधिक वेळा बजेट सादर केलं आहे. दोन वेळा तर अशी वेळ आली की, त्यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच बजेट सादर केलं. लीप इयर सोडलं तर फेब्रुवारी 28 दिवसांचा असतो. मोरारजी यांचा जन्म 29 फेब्रुवारी रोजी झाला होता. त्यांनी दोन वेळा 29 फेब्रुवारी रोजी बजेट सादर केलं होतं.

पहिल्या बजेटची स्टोरी
भारत स्वतंत्र झाल्यानंतर तीन महिन्यांचं बजेट सादर करण्यात आलं होतं. परंतु हे देशाचं पहिलं पूर्ण बजेट नव्हतं. खरं तर ही अर्थव्यवस्थेची समीक्षा होती, त्याचा एक आढावा होता. यात कोणत्याही कर प्रस्तावाचा उल्लेख नव्हता. कारण 1948-49चं बजेट केवळ 95 दिवस दूर होतं. पहिल्या बजेटच्या काही दिवसांनंतर पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंसोबतच्या तणावामुळे आर के शन्मुखम चेट्टींनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. चेट्टींच्या जाण्यानंतर के. सी. नियोगी यांनी 35 दिवसांसाठी अर्थ मंत्रालयाची कमान सांभाळली होती.

फेसबुक पेज लाईक करा – 

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like