Budget 2021 : काय झालं स्वस्त ? काय महाग झालं ? जाणून घ्या…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज संसदेत वित्तीय वर्ष 2021-22 साठीचा अर्थसंकल्प सादर केला. कोरोना काळात संपूर्ण देशाला या अर्थसंकल्पातून मोठी घोषणा होण्याची अपेक्षा होती. मात्र, अर्थमंत्र्यांनी जनतेला निराश केलेलं नाही. कोरोनाचं जागतिक संकट असतानाही अनेक गोष्टींवरील आयात कर कमी करुन सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केल्याचे सीतारामण यांनी म्हटले आहे.

अर्थमंत्र्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात दोन गोष्टी सर्वसामान्य नागरिकांसाठी खूपच महत्त्वाच्या ठरतात. त्यामध्ये इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये बदल होणार की नाही ? आणि कोणत्या गोष्टी स्वस्त होणार आणि कोणत्या गोष्टी महागणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागून असते. यातील पहिल्या गोष्टीत म्हणजे इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये सरकारकडून यंदा कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र, अनेक महत्त्वाच्या गोष्टींवरचा आयत कर कमी करुन जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. जाणून घ्या नेमकं काय स्वस्त होणार ? आणि काय महागणार ?

काय होणार स्वस्त ?
– सोनं आणि चांदीच्या आयात शुल्कात घट, त्यामुळे सोनं आणि चांदी आणखी स्वस्त होणार
– तांब्याच्या वस्तू
– स्टील आणि लोखंडी वस्तूंच्या किमती कमी होणार
– चामड्यापासून बनवलेल्या वस्तू

काय महागणार ?
– परदेशातून आयात केल्या जाणाऱ्या वाहनांच्या सुट्या भागांवरील कर वाढवण्यात आला आहे. त्यामुळे वाहनांच्या किमतीत वाढ होणार
– मोबाइलच्या काही पार्ट्सवर कर वाढवण्यात आल्याने मोबाइलच्या किमती वाढणार
– परदेशातून आयात केले जाणारे कपडे
– कॉटनचे कपडे महागणार