LPG गॅस सिलिंडर महागला !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १ फेब्रूवारीला देशाचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच देशातील सर्वात मोठी ऑईल मार्केटिंग कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) ने कमर्शियल ग्राहकांना महागाईचा धक्का दिला आहे.१९ किलो वजनाच्या कमर्शियल गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ केली आहे. इंडियन ऑईल (Indian Oil) आणि एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड हे प्रत्येक महिन्याला एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीची तपासणी करते आणि नवीन दर काय आहे त्याची घोषणा करत असते.

२०२०-२१ या आर्थिक वर्षात केंद्र सरकारने ३७ लाख २ हजार ५६५ कोटी रुपये एलपीजी सबसिडीसाठी दिले होते. तर देशातील उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत ८ कोटी लोकांना गॅस सबसिडीचा फायदा मिळतो. तसेच ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी फेब्रुवारी महिन्यासाठी गॅसच्या किमती जाहीर केल्या आहेत. एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत १९० रुपये प्रति सिलिंडरने वाढ करण्यात आली. आणि घरगुती गॅसच्या किमतीमध्ये कोणतेही वाढ करण्यात आलेली नाही. हे नवे दर आज १ फेब्रुवारीपासून लागू करण्यात आले आहेत. तरं यापूर्वी मागील महिन्यात तेल मार्केटिंग कंपन्यांनी घरगुती गॅसच्या किमतीत १०० रुपयानी असे दोन वेळा वाढ केली होती. कंपनीने यापूर्वी २ डिसेंबरला ५० रुपये आणि १५ डिसेंबरला ५० रुपयांनी प्रति सिलिंडरने वाढ केली होती.

भारतात एलपीजी गॅसची किंमत तेल कंपन्या ठरवतात. भारतात जवळपास अधिकाधिक घरांमध्ये एलपीजी कनेक्शन आहेत. एलपीजी गॅसच्या किमतीत झालेली वाढ ही खास करुन सामान्य नागरिकांवर परिणाम करते. कारण आता वाढलेल्या तेलाचे दर आणि गॅसच्या किमतीचा फटका हा सर्वसामान्यांना बसत असतो. यामुळे सरकार अनुदानाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत असत तसेच तेल कंपन्या नव्या योजना चालवून ग्राहकांना सुविधा देण्याचा प्रयत्न करत असतात.