Budget 2021 : यावर्षी छापले नाही बजेट ! स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच मोडणार परंपरा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   बजेटच्या इतिहासात प्रथमच कोरोनामुळे एक परंपरा मोडणार आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार यावर्षी पहिल्यांदा असे होईल कि, बजेटची प्रिंट कॉपी मिळणार नाही. केंद्र सरकारच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, यावर्षी अर्थसंकल्पाच्या प्रती छापल्या जाणार नाहीत आणि सर्व तपशील सॉफ्ट कॉपीच्या स्वरूपात असतील. कोविड साथीच्या आजारामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे.

पहिले पेपरलेस बजेट

आत्तापर्यंत खासदार आणि माध्यम इत्यादींसाठी बजेटची प्रत छापली जात असे. पण पहिल्यांदा अर्थसंकल्प पेपरलेस होईल. यावेळी खासदारांना अर्थसंकल्पाची एक कॉपी देण्यात येईल. हे लक्षात घेण्यासारखे आहे की वित्तमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारी रोजी 2021-22 या आर्थिक वर्षाचे बजेट सादर करतील. बजेट छापण्याची संपूर्ण प्रक्रिया वित्त मंत्रालयासाठी उत्सवासारखी होती आणि ती छापण्यासाठी बरीचशी गुप्तता घेतली जात होती. दरवर्षी अर्थ मंत्रालयाच्या कार्यालयात सुमारे 100 कर्मचारी 15 दिवस पूर्णपणे बंद होतात आणि मंत्रालयाच्या प्रेसमध्ये बजेट छापले जात असे.

आर्थिक सर्वेक्षणही सॉफ्ट कॉपीमध्ये

यावेळी अर्थसंकल्पाची एक कॉपी सामायिक केली जाईल. केंद्रीय अर्थसंकल्प व आर्थिक सर्वेक्षणांची कागदपत्रे छापली जाणार नाहीत आणि सॉफ्ट कॉपी देण्यात येणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. सर्व संसद सदस्यांना सर्वसाधारण अर्थसंकल्पाची एक कॉपी मिळेल. महत्त्वाचे म्हणजे संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारीपासून सुरू होईल व 8 एप्रिलपर्यंत चालेल. हे दोन टप्प्यात होईल. पहिला टप्पा जानेवारीत सुरू होईल आणि 15 फेब्रुवारीपर्यंत चालेल तर दुसरा टप्पा 8 मार्च ते 8 एप्रिल या काळात राहील.