Budget 2021 : निर्मला सीतारमण यांच्या भाषणामुळं ‘यांना’ झाला 6.53 लाख कोटी रूपयांचा फायदा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अर्थसंकल्पीय भाषणामुळे सर्वसामान्यांना फायदा होणार की हानी याविषयी संभ्रमात पडले असले तरी, शेअर बाजारात आज गुंतवणूकदारांचा खिसा भरला आहे. गेल्या आठवड्यात बाजारामध्ये स्थिर घसरण दिसून येत होती, पण आज अर्थसंकल्पाबरोबर गुंतवणूकदाराना मोठा दिला मिळाला. यामुळेच आज मुंबई शेअर बाजाराच्या प्रमुख निर्देशांक सेन्सेक्समध्ये 2,000 जास्त अंकांची वाढ पाहायला मिळाली. नॅशनल स्टॉक एक्सचेंज निफ्टीवर खूप उत्साह होता. निफ्टीमध्ये सुमारे 700 अंकांची वाढ दिसून आली आणि ते 14 हजारांच्या पुढे जाण्यात यशस्वी ठरले. दरम्यान, डॉलरच्या तुलनेत घसरण पाहायला मिळाली.

आज आठवड्याच्या पहिल्या व्यापार सत्रात अर्थसंकल्पाच्या आधी बाजारात वाढ झाली. या नंतर यामध्ये वेगवान वाढ दिसून आली. अर्थसंकल्पीय भाषणातील घोषणेबरोबरच बाजारातील हालचालीही वाढल्या. ब्रॉडर मार्केटमध्ये आज बीएसई स्मॉलकॅप आणि मिडकॅप या दोन्हींमध्ये चांगली वाढ दिसून आली. तर, सीएनएक्स मिडकॅप निर्देशांकही 650 अंकांपेक्षा जास्त व्यापार करताना दिसून आला.

दिवसभराच्या व्यापरानंतर बीएसई सेन्सेक्सच्या 30 स्टॉक्सपैकी केवळ तीन स्टॉक्स रेड मार्कवर दिसून आले. सोमवारी दिवसभराच्या कामकाजानंतर बीएसईचा सेन्सेक्स 2,314 अंक म्हणजेच 5 टक्क्यांनी वधारून 48,600 अंकांवर बंद झाला. नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर निफ्टी 50 देखील 646 अंकांच्या वाढीसह 14,280 वर बंद झाला. आज इंडसइंड बँक, आयसीआयसीआय बँक, बजाज फिनसर्व्ह, एसबीआय, एचडीएफसी यांचे शेअर्स सर्वात वेगवान असल्याचे दिसून आले. तर, यूपीएल, डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज, टेक महिंद्रा, सिप्ला आणि हिंदुस्तान युनिलिव्हर यांचे स्टॉक विकले गेले.

बँकिंग क्षेत्रात प्रचंड तेजी
आज सर्व क्षेत्रात वाढ पाहायला मिळाली. विमा क्षेत्र, बँकिंग, कॅपिटल गुड्स, कॉन्ज्युमर ड्युरेबल्सच्या शेअर्समध्ये आज मोठा फायदा झाला. तसेच मेटल स्टॉकमध्येही चमक दिसून आली. वास्तविक अर्थमंत्र्यांनी आज सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या भांडवलावर 20 हजार कोटी खर्च करण्याची घोषणा केली आहे. याशिवाय विमा क्षेत्राच्या एफडीआय नियमांतर्गत 49 टक्के मर्यादा 74 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे गुंतवणूकदारांच्या संवेदनाला चालना मिळाली.

10 पैकी 6 वेळा रेड मार्कवर राहिले सेन्सेक्स
2012 आणि 2013 मध्येही अर्थसंकल्प सादर झालेल्या दिवशी बीएसई सेन्सेक्स 1 टक्क्यांपेक्षा कमी घसरला होता. त्याचप्रमाणे 2014, 2016 आणि 2018 मध्ये तो अनुक्रमे 0.28 टक्के, 0.66 टक्के आणि 0.16 टक्क्यांनी घसरला. दरम्यान, गेल्या 10 वर्षात, 4 वर्षे अशी होती जेव्हा अर्थसंकल्प सादर करण्याच्या दिवशी बाजार ग्रीन मार्कवर बंद झाला. 2011, 2015, 2017 आणि 2019 मध्ये सेन्सेक्स अनुक्रमे 0.69 टक्के, 0.48 टक्के 1.75 टक्के आणि 0.58 टक्क्यांनी बंद झाला.

गुंतवणूकदारांना 6.53 लाख कोटींचा फायदा
शेअर बाजारातील या तेजीचा सर्वाधिक फायदा गुंतवणूकदारांना झाला आहे. आज दिवसभराच्या रॅलीतून त्यांना 6.53 लाख कोटी रुपयांचा फायदा झाला. वास्तविक, मुंबई शेअर बाजारात शुक्रवारी लिस्टेड सर्व कंपन्यांची एकूण मार्केट कॅप 1.86 लाख कोटी रुपये होती. परंतु, सोमवारी दिवसभराच्या व्यवसायानंतर हे वाढून 1.92 लाख कोटींच्या पुढे गेले. अशा प्रकारे केवळ एका दिवसाच्या व्यवसायात गुंतवणूकदारांना 6.53 लाख कोटी रुपयांची कमाई झाली आहे.