Gold Rate Today : बजेटच्या दिवशी सोन्याचा भावात वाढ, जाणून घ्या आजचे दर

पोलीसनामा ऑनलाईन – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला निर्मला सीतारमण 2021 चा अर्थसंकल्प आज सोमवारी (दि. 1) लोकसभेत सादर करणार आहेत. त्यामुळे बजेटआधीच सोने-चांदीच्या किंमतींमध्ये (Gold Silver rate) वाढ झाल्याचे सराफ बाजारात दिसून येत आहे. गेल्या पाच सत्रात घटणा-या सोने- चांदीच्या दरात सोमवारी किंचित (दि. 1) वाढ झाली आहे. good returns वेबसाइटच्या माहितीनुसार देशांतर्गत कमॉडिटी बाजारात सोन्याच्या दरात 10 रुपयांची वाढ झाली आहे. 22 कॅरेट सोन्यासाठी प्रति 10 ग्रॅममागे 47, 970 रुपये मोजावे लागणार आहेत. रविवारी संध्याकाळी हाच दर 47, 960 रुपये इतका होता.

तर दुसरीकडे सराफ बाजारात 24 कॅरेट सोन्याच्या दरातही 10 रुपयांची वाढ झाली आहे. प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 48, 970 रुपये इतका झाला आहे. दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा भाव 47, 970 रुपये इतका आहे. 24 कॅरेट सोन्यासाठी तो 52, 320 रुपये इतका झाला आहे. चेन्नईत 22 कॅरेट सोन्याचा भाव 46, 570 रुपये मोजावे लागत आहेत. बंगळुरू, हैदराबाद आणि केरळमध्ये देशात सर्वात स्वस्त म्हणजेच 45, 820 रुपये इतका झाला आहे.

दरम्यान अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सोन्याच्या दरात किंचित वाढ होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे सराफ व्यावसायिकांनी सोन्यावरील शुल्क कपातीची मागणी केली आहे. अर्थसंकल्पात तशी घोषणा झाल्यास सोन्याचे दर कमी होऊ शकतात, असे सांगण्यात येत आहे.