नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Budget-2022 | देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) या 1 फेब्रुवारी 2022 रोजी 2022-23 या आर्थिक वर्षासाठीचा (Financial Year) केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget) सादर करणार आहेत. इतकंच नाही तर त्या आपला चौथा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्पात (Budget-2022) काय असेल याची उत्सुकता सर्वसामान्य जनतेपासून ते उद्योग विश्वाला लागली आहे. अशातच अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे.
भारताची निर्यात (Export) विक्रमी स्तरावर पोहोचली आहे. देशाची निर्यात विक्रमी 393 अब्ज डॉलरपर्यंत (Dollars) पोहोचली आहे. मागील एका दशकाचा विचार केला तर देशाची निर्यात 250 ते 330 अब्ज डॉलर दरम्यान राहिली आहे. जगावर कोरोनाचे (Corona) संकट असताना मागणी वाढत चालली आहे. यामुळे भारताच्या निर्यातीमध्ये मोठी वाढ झाली आहे. ग्लोबल एक्सपोर्टमध्ये (Global Export) भारताचा हिस्सा ऑल टाइम स्तरावर (All Time Level) पोहचला आहे. गेल्या 3 महिन्यात ग्लोबल ट्रेडमध्ये (Global Trade) भारताचा वाटा 2 टक्क्यांच्या पुढे आहे. भारताच्या निर्यातीच्या वृद्धीचे सर्वात मोठे कारण कमोडिटी वस्तूंच्या (Commodity Goods) किमती वाढल्यामुळे आहे. (Budget-2022)
इलेक्ट्रॉनिक्सचा मोठा वाटा
ग्लोबल ट्रेडचा विचार केला तर यामध्ये इलेक्ट्रॉनिक (Electronic) वस्तूंचा सर्वात मोठा वाटा आहे. या क्षेत्रात भारताचा यामध्ये आजपर्यंत थोडा वाटा होता. परंतु 2021 मध्ये 16 अब्ज डॉलरची निर्यात केली असून ती 2018 तुलनेत दुप्पट आहे. भारताने पुढील चार वर्षात या क्षेत्रातील निर्यात 110 अब्ज डॉलर करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
–
प्रोडक्शन लिंक्ड इसेंटिव्हचा फायदा
भारतामध्ये स्मार्टफोन (Smartphone) तयार करणाऱ्या 30 कंपन्या असून ज्या स्मार्टफोनचे असेंबलिंग (Assembling) करतात. यातील केवळ 10 प्रोडक्शन लिंक्ड इसेंटिव्हचा फायदा मिळतो. त्यामुळे भारत इतर इलेक्ट्रॉनिक असेंबलिंगमध्ये वेगाने वाढ करत आहे. अनेक कारखाने आणि कंपन्याचा यामध्ये समावेश केला जात आहे.
फाइन केमिकलमध्ये भारताचा 3 टक्के वाटा
टेक्सटाईल (Textile) आणि अपॅरल एक्सपोर्टमध्ये (Apparel Exports) भारताची निर्यात मागील वर्षी विक्रमी झाली आहे.
मागिल वर्षी या क्षेत्रातील निर्यात 38 अब्ज डॉलर स्तरावर पोहचली आहे.
2013 पासून गारमेंट एक्सपोर्ट (Garment Export) 32-33 अब्ज डॉलर स्तरावर आहे.
आता यार्न आणि फॅब्रिकच्या किमती वाढल्याने निर्यातीचे आकडे वाढण्यास मदत होत आहे.
एक्सपोर्टमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा मोठा वाटा असलेल्या फाइन केमिकलमध्ये (Fine Chemicals) मागील एका दशकात भारताचा वाटा 3 टक्क्यांवर पोहचला आहे.
Web Title :- Budget 2022 | budget 2022 good news before budget what you can get in fm nirmalas budget
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update