Budget 2022 | बजेटमध्ये 39 लाख कोटी रुपयांची सर्वात मोठी रक्कम मिळाली ‘या’ मंत्रालयाला, पहा संपूर्ण तक्ता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – | 2022 च्या अर्थसंकल्पात (Budget 2022) विविध मंत्रालयांना खर्चासाठी मोठी रक्कम देण्यात आली आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यावर सरकारचा भर आहे. याशिवाय सीमेवरील वाढता धोका लक्षात घेऊन संरक्षण बजेटमध्ये (Budget 2022) मोठी रक्कम ठेवण्यात आली आहे. रेल्वेलाही मजबूत आणि वेगवान करण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूदी करण्यात आल्या आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी 2022-23 मध्ये एकूण 39.45 लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे.

 

कोणत्या विभागाला किती वाटप.

संरक्षण मंत्रालयाला (Ministry of Defence) गेल्या वर्षीप्रमाणे सर्वाधिक 5,25,166.15 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे.
मंत्रालयाला दिलेला निधी 2021 च्या तुलनेत वाढला आहे. यापूर्वी 4,78,196 कोटी रुपयांचे बजेट होते.

ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय (ministry of consumer affairs food and public distribution) दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्यासाठी 2,17,684.46 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे.
गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पातही मंत्रालय 2,56,948 कोटी रुपयांसह दुसऱ्या क्रमांकावर होते.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय (ministry of road transport and highways) 1,99,107.71 कोटी रुपयांच्या वाटपासह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
गृहमंत्रालयापेक्षा या मंत्रालयाला जास्त पैसा मिळाला आहे.
कारण सरकारने पीएम गति शक्ती (pm gati shakti scheme) योजनेअंतर्गत राष्ट्रीय महामार्ग (National Highway) व्यवस्थेचा विस्तार करण्याची घोषणा केली आहे.

गृह मंत्रालय (ministry of home affairs) 1,85,776.55 कोटी रुपयांसह चौथ्या क्रमांकावर आले आहे, जे गेल्या वर्षीच्या 1,66,547 कोटी रुपयांच्या संख्येपेक्षा किंचित जास्त आहे. (Budget 2022)

रेल्वे मंत्रालयाला (Ministry of Railways (Railway Board)) पाचवे स्थान मिळाले आहे.
त्यासाठी 1,40,367.13 कोटी रुपये वाटप करण्यात आले आहेत.

ग्रामीण विकास मंत्रालय (Ministry of Rural Development) सहाव्या क्रमांकावर आहे, व त्याला 1,38,203.63 कोटी रुपये मिळाले आहेत, जे मागील अर्थसंकल्पातील 1,33,690 कोटी रुपयांपेक्षा किंचित जास्त आहे.

रसायन आणि खते मंत्रालयाने (ministry of chemicals and fertilizers) 1,32,513.62 कोटी रुपयांच्या वाटपासह सातवे स्थान मिळवले आहे.

 

या योजनांवर खर्चाचे वाटप

पीएम किसान (PM Kisan) – 68,000 कोटी रुपये

जल जीवन मिशन (Jal Jeevan Mission) – 60,000 कोटी रुपये

राष्ट्रीय शैक्षणिक अभियान (National Education Campaign) – 39,553 कोटी रुपये

राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission) – 37,800 कोटी रुपये

पंतप्रधान ग्राम सडक योजना (PM Gram Sadak Yojana) – 19,000 कोटी रुपये

 

Web Title :- Budget 2022 | budget 39 lakh crore budget fm nirmala sitharaman budget recovery from pandemic know ministry wise fund allocation

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा