Budget 2022 on Mobile App | तुम्हाला या मोबाईल अ‍ॅपवर संपूर्ण बजेट मिळेल, तुम्ही येथून डाउनलोड करू शकता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Budget 2022 on Mobile App | अर्थमंत्री निर्मला सीतारामन (FM Nirmala Sitharaman) 1 फेब्रुवारी 2022 रोजी म्हणजेच मंगळवारी सकाळी 11 वाजता बजेट सादर करतील. सर्वसामान्यांना अर्थसंकल्पाची माहिती सहज उपलब्ध व्हावी यासाठी सरकारने मोबाइल ॲप (Budget 2022 on Mobile App) सुरू केले आहेत. संपूर्ण बजेट ॲपवर हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषेमध्ये उपलब्ध असेल. अर्थमंत्री सीतारामन यांनी बजेट (Aam budget 2022) सादर केल्यानंतर लवकरच या ॲपवर बजेट उपलब्ध होईल.

 

मोबाईल ॲपवर यूजर त्यांच्या सोयीनुसार बजेट हिंदी किंवा इंग्रजीमध्ये पाहू शकतील. युनियन बजेट मोबाईल ॲप (Union Budget Mobile App) असे या ॲपचे नाव आहे. बजेट ॲप http://indiabudget.gov.in वरून डाउनलोड करता येईल.

संसद ॲपवर बजेट लाईव्ह पाहा
बजेट-2022 लाईव्ह मोबाईलवर (Budget 2022 on Mobile App) पाहता येईल. यासाठी डिजिटल संसद नावाचे ॲप (Digital Sansad App) लॉन्च करण्यात आले आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला (om birla) म्हणाले की, डिजिटल संसद ॲपवर संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण, सभागृहांच्या दैनंदिन कामकाजाची माहिती, तसेच सभागृहाच्या पटलावर ठेवण्याच्या पत्राबरोबर 1947 पासून आतापर्यंत अर्थसंकल्पावर केलेली चर्चा देखील उपलब्ध आहेत. या ॲपवर तुम्ही सर्वसाधारण बजेट लाईव्ह पाहू शकाल.

 

पहिल्यांदाच हलवा समारंभ रद्द
दरवर्षी अर्थसंकल्पापूर्वी होणारा ‘हलवा सोहळा’ यावेळी ओमिक्रॉनमुळे रद्द करण्यात आला आहे. भारताच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे, जे ही प्री-बजेट परंपरा पाळली जात नाही. दिल्लीतील साथीच्या आजाराची धोकादायक परिस्थिती पाहता हे पाऊल उचलण्यात आल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. अर्थसंकल्प 2022 (Union Budget) ची तयारी अंतिम टप्प्यात आहे. अशा परिस्थितीत संसर्गाचा धोका आणि आरोग्य प्रोटोकॉल लक्षात घेऊन यावेळी मुख्य कर्मचाऱ्यांना मिठाई वाटण्यात आली आहे. अर्थसंकल्प तयार करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना कामाच्या ठिकाणीच ‘लॉक इन’ मोडमध्ये ठेवण्यात आले आहे.

 

Web Title :- Budget 2022 on Mobile App | budget 2022 on mobile app launched fm nirmala sitharaman loksabha

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा