Budget 2022 | बजेटमध्ये काय झाले स्वस्त आणि काय महाग ? जाणून घ्या कुठे खर्च करावे लागतील जास्त पैसे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Budget 2022 | अर्थमंत्री निर्मला सीतारामन (FM Nirmala Sitharaman) यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. यादरम्यान निर्मला सीतारामन यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. जाणकारांचे म्हणणे आहे की हा शिलकीचा अर्थसंकल्प आहे. मात्र, संपूर्ण अर्थसंकल्पात पगारदार वर्ग डोळ्यासमोर ठेवून कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर काही गोष्टी स्वस्त होतील तर काही महाग होतील. (Budget 2022)

 

काही वस्तूंवर कस्टम ड्युटीत कपात
सार्वत्रिक अर्थसंकल्पानंतर तुम्हाला कोणत्या वस्तुंसाठी पूर्वीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागतील, तसेच, आता कोणत्या गोष्टींमुळे तुमचे पैसे वाचतील ते जाणून घेवूयात. अर्थमंत्र्यांनी अनेक गोष्टींवरील कस्टम ड्युटी, आयात शुल्क यासह सर्व शुल्क वाढवण्याबद्दल आणि कमी करण्याबद्दल भाष्य केले आहे. जाणून घेऊया काय स्वस्त झाले आणि काय महाग झाले ? (Budget 2022)

 

स्वस्त

मोबाईल चार्जर स्वस्त होईल

शेतीच्या वस्तू स्वस्त होतील

हिर्‍याचे दागिने स्वस्त होतील

शूज आणि चप्पल स्वस्त होतील

परदेशातून येणार्‍या मशिन्स स्वस्त होतील

मोबाईल फोन, कापड, लेदर

 

हे महागणार
कॅपिटल गुड्सवर आयात शुल्कातील सूट काढून टाकत 7.5 टक्के आयात शुल्क लावण्यात आले आहे. इमिटेशन ज्वेलरीवरील कस्टम ड्युटी वाढवण्यात आली आहे. जेणेकरून त्याची आयात कमी करता येईल. तसेच परदेशी छत्रीही महागणार आहे.

 

इथेही दिलासा
एमएसएमईना मदत करण्यासाठी, अर्थमंत्र्यांनी स्टील स्क्रॅपवरील कस्टम ड्युटी सूट एका वर्षासाठी वाढवण्याची घोषणा केली आहे.
मेंथा ऑईलवरील कस्टम ड्युटी कमी करण्यात आली आहे.

 

Web Title :- Budget 2022 | Union budget 2022 big annoucements for middle class nirmala sitharaman what is become cheap and what is become expensive in the budget Know in details

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा