Budget 2022 | मागच्या पेक्षा मोठा असेल अर्थसंकल्प, जाणून घ्या किती रुपये वाढवू शकते सरकार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Budget 2022 | सरकारने आगामी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून महामारीचा सामना करण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. खर्चावर भर देत यंदा अर्थसंकल्पातही वाढ करण्यात आली आहे. काही रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, यंदाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प 2001 च्या अर्थसंकल्पापेक्षा 14 टक्के मोठा असेल. (Budget 2022)

 

ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, अर्थमंत्र्यांचा संपूर्ण भर खर्च वाढवून अर्थव्यवस्थेला गती देण्यावर असेल. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) वित्तीय तुटीची चिंता न करता अर्थसंकल्पाचा आकार गेल्या वेळेपेक्षा 14 टक्क्यांनी वाढवू शकतात. अर्थतज्ज्ञांमध्ये केलेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की 2021-22 च्या अर्थसंकल्पाचा आकार 39.6 लाख कोटी रुपयांचा असू शकतो. चालू आर्थिक वर्षासाठी सरकारने 34.83 लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता. (Budget 2022)

 

तरीही रिकामाच राहणार सामान्यांचा हात
सरकार वाढीव अर्थसंकल्पाचा वापर पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी आणि रोजगार वाढवण्यासाठी करेल, असे अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे कर दरांवर काही दिलासा मिळेल अशी आशा कमी आहे. वित्तीय तूटीची स्थिती देखील साथीच्या रोगामुळे प्रभावित कुटुंबांना फारसा दिलासा देण्याच्या स्थितीत नाही. अशा स्थितीत सर्वसामान्यांनी अर्थसंकल्पाकडून फारशा अपेक्षा ठेवू नयेत.

 

यावेळी आणखी कर्ज घेऊ शकते सरकार
पायाभूत क्षेत्रातील मोठ्या योजनांना निधी उपलब्ध करून देण्यासाठी यावेळीही सरकार मोठ्या प्रमाणावर कर्जावर अवलंबून असेल. अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांचा भर पुन्हा एकदा निर्गुंतवणुकी (Disinvestment) च्या माध्यमातून सरकारी मालमत्ता विकून निधी उभारण्यावर असेल. याशिवाय 13 लाख कोटींचे मोठे कर्जही घेतले जाऊ शकते. 2021 च्या अर्थसंकल्पात सरकारने 12.05 लाख कोटी रुपयांच्या कर्जाची घोषणा केली होती.

 

Web Title :- Budget 2022 | upcoming budget size may increase by 14 percent government focus on infrastructure

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा