Budget 2023 | ‘हा तर महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार..;’ केंद्रीय बजेटवर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन (FM Nirmala Sitharaman) यांनी मोदी सरकारच्या (Modi Govt) दुसऱ्या टर्ममधील शेवटचा अर्थसंकल्प (Budget 2023) संसदेत मांडला. आता यावरून राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येणे सुरू झाले आहे. या अर्थसंकल्पातून मुंबई किंवा महाराष्ट्राच्या वाट्याला काहीच आले नाही. अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी यावेळी बोलताना केली. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. (Budget 2023)
यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘हा अर्थसंकल्प म्हणजे महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. ज्या राज्यांमध्ये भाजपला (BJP) राजकीय यश मिळाले आहे, किंवा ज्या राज्यांमध्ये निवडणुका येवू घातल्या आहेत, त्या राज्यांना या अर्थसंकल्पात झुकते माप मिळाले आहे. पण यात मुंबई किंवा महाराष्ट्राच्या वाट्याला काहीच आले नाही. हा एकप्रकारे महाराष्ट्रला दिल्लीसमोर झुकविण्याचा प्रयत्न आहे.’ अशी टीका ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर केली.
पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, ‘ज्या राज्यात आताच निवडणुका होऊन गेल्या, मोठ्या संख्येने म्हणजे १५० पेक्षा अधिक जागांवर भाजपला विजय मिळाला, त्या राज्यासाठी अर्थसंकल्पात (Budget 2023) अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातून वेदांता-फॉक्सकॉन (Vedanta-Foxconn), एअरबस (Airbus) प्रकल्प गुजरातला नेण्यात आले. वित्तीय केंद्र तिकडे नेण्यात आले, त्यांना अधिक सवलती देण्यात आल्या. महाराष्ट्रातून अनेक प्रकल्प गुजरातला नेले. तरीही ज्या महाराष्ट्रातून उद्योग अन्यत्र गेले त्यांना काहीच मिळाले नाही. हा महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. कर्नाटकमध्येही निवडणुका (Karnataka Elections) होऊ घातल्या आहेत. एक्झिट पोल्समध्ये त्याठिकाणी भाजपला जास्त जागा मिळताना दिसत नाहीत. त्यामुळे अर्थसंकल्पात कर्नाटकसाठी खर्च करण्यात आला आहे. पण अर्थसंकल्पात महाराष्ट्र किंवा मुंबईचा उल्लेख नाही. महाराष्ट्रात घटनाबाह्य सरकार असूनही राज्याला काहीच मिळाले नाही. हा मुंबई आणि महाराष्ट्राला दिल्लीसमोर झुकवण्याचा प्रकार आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला अर्थसंकल्पात काहीच आलं नाही.’ अशी टीका त्यांनी यावेळी मोदी सरकारवर केली.
दरम्यान, आता आदित्य ठाकरे यांच्या या टीकेवर सत्ताधारी काय प्रतिउत्तर देतात. हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.
Web Title :- Budget 2023 | aaditya thackeray reaction on fm nirmala sitharaman union budget 2023
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update