Budget 2023 | शेतीक्षेत्रासाठी ‘या’ आहेत मोदी सरकारच्या बजेटमधील महत्वाच्या घोषणा

0
216
Budget 2023 | budget 2023 government launches pm pranam yojna to promote organic farming
file photo

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय मंत्री निर्मला सितारामन मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील शेवटचा अर्थसंकल्प (Budget 2023) सादर करत आहेत. यावेळी त्यांनी विविध क्षेत्रांतील गुंतवणूकीसोबतच विविध क्षेत्रांच्या बळकटीकरणावर भर दिला. यावेळी संसदेत बोलताना त्यांनी विविध क्षेत्रांसाठी घोषणा केल्या. यात शेती विकासावर देखील मोदी सरकारकडून भर दिला गेला असल्याचे दिसले. कोरोना काळात देशाचा अर्थव्यवस्थेचा कणा म्हणुन उभा राहिलेल्या शेती क्षेत्रावर मोदी सरकारकडून विविध कल्याणकारी योजनांची घोषणा करण्यात आली. (Budget 2023)

 

अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी शेती क्षेत्रासाठीच्या विविध योजनांची घोषणा केली. त्या खालीलप्रमाणे:

– ऍग्रो स्टार्टअप साठी फंडाची तरतूद.
– पशुपालन मत्स्यपालनासाठी एकूण २० लाख कोटींची तरतूद.
– सहा हजार कोटींची विशेष गुंतवणूक करून मत्स्यपालनाला विशेष प्रोत्साहन.
– कृषी लोन २० लाख कोटींपर्यंत वाढवण्यात आलं आहे.
– कृषी सोसायटीसाठी विशेष तरतूद. (Budget 2023)
– मच्छीमारांसाठी ६००० कोटींचा फंड.
– फलोत्पादनासाठी २२०० कोटींची तरतूद.
– कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी भरीव तरतूद.
– ऑरगॅनिक शेतीसाठी पीएम प्रणाम योजना.
– कृषी लोन सुविधा २० लाख कोटींनी वाढवण्यात येणार.
– डाळीसाठी विशेष हब तयार केले जाणार.
– राज्याच्या उत्पादनांना चालना देण्यासाठी युनिटी मॉल बनवणार.

 

केंद्र शासनाकडून राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील एक करोड शेतकऱ्यांना ऑरगॅनिक फार्मिंगचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यात रासायनिक खतांना पर्यायी असलेल्या सेंद्रीय खतांबद्दल व त्याच्या योग्य वापराबद्दलचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना दिले जाणार आहे.

 

दरम्यान, जगभरात आर्थिक मंदीबाबत चर्चा सुरू असतानाच सबंध जगाचे लक्ष हे भारताच्या अर्थसंकल्पाकडे लागले आहे.

Web Title :- Budget 2023 | budget 2023 government launches pm pranam yojna to promote organic farming

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Budget 2023 | मोठी बातमी! केंद्र सरकारकडून आयकर दात्यांसाठी महत्वाची घोषणा; आता सात लाखांच्या उत्पन्नावर आयकर नाही

Pune Solapur Highway Accident | पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, पोलिस कर्मचाऱ्यासह 4 जण जागीच ठार, 17 जखमी

Maharashtra Politics | अजित पवारांचा कट्टर समर्थक आमदार एकनाथ शिंदेच्या गळाला? गाडीतून केला प्रवास; राजकीय चर्चांना उधाण