Budget 2023 | केंद्रीय अर्थसंकल्पावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची टीका; म्हणाले

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – Budget 2023 | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (FM Nirmala Sitharaman) नी आज देशाचा अर्थसंकल्प जाहीर केला. हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक असल्याची प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मात्र मोदी सरकारच्या या अर्थसंकल्पावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress State President Nana Patole) यांनी टीका केली आहे. या अर्थसंकल्पात आकर्षक घोषणा, अलंकारिक शब्द, आकड्यांचा खेळ आणि गुलाबी स्वप्ने यापलिकडे ठोस काहीही नाही. अशी टीका नाना पटोले यांनी केली. ते यावेळी माध्यमांशी बोलत होते. (Budget 2023)

 

अर्थसंकल्पात घोषणा करायच्या पण प्रत्यक्षात अंमलबजावणी नाही करायची. ही मोदी सरकारची कार्यपध्दती आहे. आणि अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सादर केलेला हा अर्थसंकल्प याच कार्यपध्दतीचा भाग आहे. अशी टीका यावेळी बोलताना नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर केली. महागाई (Inflation), बेरोजगारी (Unemployment), शेतकरी (Farmers), मनरेगा (MGNREGA), पेट्रोल (Petrol), डिझेल (Diesel), एलपीजी गॅसच्या किंमती (LPG Gas Prices) शेतमालाला किमान आधारभूत किंमत (Minimum Support Price for Agricultural Commodities) या ज्वलंत प्रश्नावर चकार शब्द देखील अर्थमंत्र्यांनी काढला नाही. देशातील जनतेची घोर निराशा करण्याचे काम केंद्र सरकारने केले आहे. अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर केली आहे.

 

यावेळी पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले, देशातील सर्वात जास्त लोकांना रोजगार देणाऱ्या कृषी क्षेत्राला आणि शेतकऱ्यांना या बजेटमधून काही देखील दिलासा मिळालेला नाही. ना पीक कर्जाच्या व्याजदरात काही सवलत मिळाली, ना किमान आधारभूत किंमतीबद्दल काही घोषणा केली गेली. ना खते बियाण्यांवरील जीएसटी कमी केला, ना शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा काही फॉर्मुला अर्थमंत्र्यांनी दिला. रसायन मुक्त शेती (Chemical Free Farming), किसान ड्रोन, शेतकऱ्यांना डिजीटल आणि हायटेक सेवा अशा आकर्षक शब्दांच्या पलीकडे शेतकऱ्यांसाठी काहीच मिळाले नाही. अशी टीका यावेळी बोलताना नाना पटोले यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर केली.

दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील बजेटवर आपली प्रतिक्रिया नोंदविली.
यावेळी माध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा अमृत काळातील सर्वजन हिताय,
या संकल्पनेवर आधारित अशाप्रकाराचा अर्थसंकल्प आहे. समाजातील शेवटच्या व्यक्तीचा विचार करत
असताना गरीब (Poor), मध्यमवर्गीय (Middle Class), शेतकरी (Farmers), उद्योजक (Entrepreneurs) आणि
युवा (Youth) अशा सगळ्या लोकांचा विचार या अर्थसंकल्पाने केला आहे.’
अशी प्रतिक्रिया अर्थसंकल्पावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

 

Web Title :- Budget 2023 | numbers game nana patole criticism on the union budget procedure of modi govt

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Budget 2023 | ‘हा तर महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार..;’ केंद्रीय बजेटवर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची टीका

Kolhapur Police Inspector / API Transfer | कोल्हापूर पोलीस : 18 पोलीस निरीक्षक आणि 5 सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

Pune By Elections | कसब्याची जागा आपल्या पारड्यात पाडून घेण्यासाठी महाविकास आघाडीत रस्सीखेच! इच्छुकांची मोठी यादी