Budget 2023 | ‘बजेटमधून मुंबईकरांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली;’ शिवसेना खासदार विनायक राऊत यांची मोदी सरकारवर टीका

0
145
Budget 2023 | shiv sena thackeray group mp vinayak raut criticized modi govt over union budget 2023
file photo

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अर्थमंत्री निर्मला सितारामन (FM Nirmala Sitharaman) यांनी आज संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प (Budget 2023) सादर केला. यात विविध क्षेत्रांसाठी विविध घोषणा करण्यात आल्या आहेत. मात्र या अर्थसंकल्पावर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी मोदी सरकारवर (Modi Govt) टीका केली. (Budget 2023)

 

यावेळी बोलताना खासदार विनायक राऊत म्हणाले की, ‘निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला असला तरी, यातून घोर निराशा झाली आहे.’ अशी टीका ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केली. पुढे बोलताना ते म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे सतत मुंबईत येत आहेत. मुंबईकरांसाठी मोठे पॅकेज जाहीर केले जाईल. असे वाटले होते. मात्र, मुंबईकरांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली आहेत. अशी टीका विनायक राऊत यांनी केली. बजेटवर बोलताना त्यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाना साधला.

 

‘शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना जाहीर करतानाच, त्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे सूचित करण्यात आले होते. मात्र, त्यासाठीचा योग्य बाजार मिळावा, यासाठी काही ठोस उपाययोजना करण्याची गरज होती. ती करण्यात आलेली नाही. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात भारताची अर्थव्यवस्था ५ ट्रिलीयनवर जाईल. असे सांगण्यात आले होते. मात्र या अर्थसंकल्पात ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेवर अवाक्षरही काढण्यात आलेले नाही. हे उद्दिष्ठ पूर्ण करण्याच्या कोणत्या टप्प्यावर देश आहे, याबाबतही सांगण्यात आलेले नाही. अदानी समुहामुळे झालेल्या कोट्यावधींच्या नुकसानीवर मोदी सरकारने भाष्य देखील केले नाही.’ अशी टीका यावेळी बोलताना विनायक राऊत यांनी केंद्र सरकारवर केली आहे. (Budget 2023)

यावेळी विनायक राऊत यांनी अदानी समुहावर (Adani Group) देखील टीका केली आहे.
विनायक राऊत म्हणाले, ‘अदानी समुहामुळे भारताची अर्थव्यवस्था वेगाने घसरत चालली आहे.
त्यामुळे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी ५ ट्रिलियन डॉलरच्या मुद्यावर दुर्लक्ष केले.
इन्कम टॅक्समध्ये सवलती देत असताना, यावर आणखी स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता होती.
तसेच सर्वसामान्यांच्या दृष्टीकोनातून सात प्राधान्य असलेल्या गोष्टी जाहीर करण्यात आल्या आहेत.
मात्र देशात मोठ्या प्रमाणावर असलेल्या मायनॉरटी कम्युनिटीला (Minority Community)
यात कुठेही प्राधान्य देण्यात आले नाही. यामुळे त्यांच्यावर अन्याय झाला आहे. असे मत देखील यावेळी बोलताना विनायक राऊत यांनी व्यक्त केले.

 

Web Title :- Budget 2023 | shiv sena thackeray group mp vinayak raut criticized modi govt over union budget 2023

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Budget 2023 | ‘हा तर महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार..;’ केंद्रीय बजेटवर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची टीका

Kolhapur Police Inspector / API Transfer | कोल्हापूर पोलीस : 18 पोलीस निरीक्षक आणि 5 सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

Pune By Elections | कसब्याची जागा आपल्या पारड्यात पाडून घेण्यासाठी महाविकास आघाडीत रस्सीखेच! इच्छुकांची मोठी यादी