Budget 2023 | अर्थमंत्री सीतारामन मध्यमवर्गीयांना देऊ शकतात मोठी भेट, टॅक्स सवलत मर्यादा वाढवण्यावर विचार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बजेट २०२३ मध्ये (Budget 2023), बेसिक इन्कम टॅक्स सवलतीची मर्यादा २.५ लाख रुपयांवरून ५ लाख रुपये केली जाऊ शकते. नोकरदार मध्यमवर्गीय करदात्यांना अर्थमंत्री निर्मला सीतारामन दिलासा देऊ शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. सध्या, बेसिक इन्कम टॅक्स सवलतीची मर्यादा वैयक्तिक करदात्यांसाठी दोन्ही नवीन आणि जुन्या प्राप्तीकर प्रणाली अंतर्गत २.५ लाख रुपये आहे (Budget 2023).

 

आता काय आहेत नियम?
याशिवाय, इन्कम टॅक्स अ‍ॅक्ट, १९६१ च्या कलम ८७अ अंतर्गत, ५ लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेला वैयक्तिक करदाता १२,५०० रुपयांच्या इन्कम टॅक्स रिबेटसाठी पात्र असेल.

 

ही तरतूद इन्कम टॅक्सच्या दोन्ही प्रणालींतर्गत उपलब्ध आहे. याचा अर्थ असा की ५ लाखांपर्यंत नेट टॅक्सेबल इन्कमसह लोकांना इन्कम टॅक्समधून पूर्णपणे सूट दिली जाते, जरी त्यांनी कोणतीही निवडली तरी. लक्षात घ्या की वैयक्तिक करदात्यांची बेसिक टॅक्स सवलत मर्यादा तुमच्या वयावर आणि जुन्या कर प्रणाली अंतर्गत निवासी स्थितीवर अवलंबून असते.

का होऊ शकते ही घोषणा?
२०२३ च्या बजेटमध्ये (Budget 2023) बेसिक इन्कम टॅक्स सवलत मर्यादा २.५ लाख रुपयांवरून ५ लाख रुपयांपर्यंत वाढवण्यास एक्सपर्ट सांगत आहेत, ज्यामुळे वापर वाढेल आणि आर्थिक रिकव्हरीस मदत होईल. एसोचॅमचे सक्रेटरी दीपक सूद म्हणाले की, वैयक्तिक इन्कम टॅक्ससाठी मर्यादा वाढवण्याची मागणी यावर अवलंबून आहे की मध्यमवर्गीय ग्राहकांच्या हातात जास्त पैसा शिल्लक रहावा. यामुळे आर्थिक रिकव्हरीमध्ये मागणी वाढण्यासही मदत होईल.

 

२०२३ च्या अर्थसंकल्पाची तयारी सुरू झाली आहे. १ फेब्रुवारी २०२३ रोजी सादर होणारा अर्थसंकल्प करदात्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो.
पगारदार व्यक्तींसाठी, स्टँडर्ड डिडक्शन आणि इन्कम टॅक्सचे सेक्शन ८० सी मध्ये गुंतवणुकी सवलतीची मर्यादा वाढविली जाऊ शकते.
मागील ९ वर्षांत करदात्यांना कराच्या आघाडीवर काहीही मिळाले नाही.
सन २०१४ मध्ये सरकारने करमुक्त उत्पन्नाची मर्यादा आणि कलम ८०सी मध्ये वाढ केली होती,
परंतु त्यानंतर करदात्यांना मोठा दिलासा देण्यात आलेला नाही.
सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी सरकार करदात्यांना खुश करू शकते.
कारण, मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प असेल.

 

Web Title :- Budget 2023 | union budget finance minster can announce income tax exemption limit

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

BBM4 | बिग बॉस मराठीला 4 मिळाले टॉप 5 स्पर्धक; मिड वीकला ‘हा’ खेळाडू …

Tara Sutaria | आदरशी खरंच ब्रेकअप झालं का? या प्रश्नावर तारा सुतारियाने दिली प्रतिक्रिया

Pune Police News | सर्व पोलीस ठाण्यात बालस्नेही कक्षाची लवकरच स्थापना – पालकमंत्री चंद्रकांत पाटील