Budget 2020 : नेहमी चर्चेत रहातात ‘हे’ 10 अर्थसंकल्प, जाणून घ्या काय होतं विशेष त्यांच्यात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील दुसरा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सितारमन 1 फेब्रुवारीला सादर करतील. अर्थसंकल्पातून सर्वांना अनेक अपेक्षा आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष अर्थसंकल्पावर आहेत. भारताचा पहिला अर्थसंकल्प 18 फेब्रुवारी 1860 ला जेम्स विल्सन यांनी सादर केला होता. असेच काही अर्थसंकल्प जे ऐतिहासिक मानले जातात, ज्यावर कायम चर्चा झाली आहे.

1. 1951 चा अर्थसंकल्प –
हा भारतीय गणराज्याचा पहिला अर्थसंकल्प होता. जो अर्थमंत्री जॉन मथाई यांनी सादर केला होता. या अर्थसंकल्पात योजना आयोगाच्या निर्मितीचा मार्ग प्रशस्त केला होता. योजना आयोग मोदी सरकार आल्यानंतर नीति आयोगात बदलण्यात आला. जवाहरलाल नेहरु योजना आयोगाचे पहिले अध्यक्ष होते.

2. 1968-69 चा अर्थसंकल्प –
‘Spouse Allowance’ या वर्षाच्या अर्थसंकल्पातून समाप्त करण्याची घोषणा करण्यात आली होती. हा भत्ता टॅक्स वाचवण्याचे माध्यम होते.

3. 1969-70 चा अर्थसंकल्प –
हा अर्थसंकल्प सादर करण्यात आल्यानंतर काही वस्तूंच्या किंमतीत तेजी आली होती. या अर्थसंकल्पात ‘Status Symbol’ च्या रुपात असलेल्या प्रोडक्ट्सवर टॅक्स वाढवण्यात आला होता. या अर्थसंकल्पात इम्पोर्टेड कारवर ड्यूटी 60 वरुन 100 टक्के वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

4. 1970-71 चा अर्थसंकल्प –
या वर्षाचा अर्थसंकल्प पंतप्रधान आणि अर्थमंत्री इंदिरा गांधी यांनी सादर केला होता. हा पहिला अर्थसंकल्प होता जो एका महिलेने सादर केला होता.

5. 1971-75 चा अर्थसंकल्प –
या अर्थसंकल्पात रोख रक्कमेने होणाऱ्या व्यवहारांवर अंकुश आणण्याची नवी व्यवस्था तयार करण्यात आली. याचा थेट परिणाम पर्यटनावर झाला. या अर्थसंकल्पात रोख रक्कम देऊन तिकीट खरेदी केल्यास त्यावर 20 टक्के टॅक्स लावण्याची तरतूद होती. तर परदेशीत चलनात तिकीटाचे पैसे दिल्यास टॅक्समध्ये सूट देण्यात आली होती.

6. 1974-75 चा अर्थसंकल्प –
या अर्थसंकल्पात इनकम टॅक्स स्ट्रक्चरमध्ये सुधारणा करण्यात आली होती. यात आयकर आणि सरचार्ज 97.75 टक्क्यांवरुन 75 टक्के करण्यात आला होता.

7. 1986-87 चा अर्थसंकल्प –
काँग्रेस सरकारचे तत्कालीन अर्थमंत्री व्ही. पी. सिंह यांनी हा अर्थसंकल्प सादर केला होता. या अर्थसंकल्पात लाइसंन्स राजची समाप्ती करण्यात आली होती. तसेच इतर करात देखील सुधारणा करण्यात आली होती.

8. 1991 – 1996 चे अर्थसंकल्प –
या दरम्यान देशाची अर्थव्यवस्था संकटातून जात होती. तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिम्हा राव यांनी 1991 मध्ये ब्यूरोक्रॅट असलेले डाॅ. मनमोहन सिंग यांना अर्थमंत्री बनवले. मनमोहन सिंग यांनी अर्थसंकल्पात अनेक महत्वाचे धोरणात्मक बदल केले. त्यांना भारतीय अर्थव्यवस्थेच्या उदारीकरणासाठी ओळखले जाते. त्यांनी भारताची अर्थव्यवस्था जगासाठी खुली करण्याचा निर्णय घेतला.

9. 2000-2001 चा अर्थसंकल्प –
तत्कालीन अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी हा अर्थसंकल्प सादर केला होता. यात भारताला प्रमुख सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट हबच्या रुपात पाहिले गेले. या अर्थसंकल्पामुळे आयटी इंडस्ट्रीमध्ये उत्तम विकास झाला.

10. 2019-20 चा अर्थसंकल्प –
हा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सितारमन सादर करतील. इंदिरा गांधी यांच्यानंतर त्या दुसऱ्या महिला आहेत ज्या देशाचा अर्थसंकल्प सादर करतील. या अर्थसंकल्पाने 2024 पर्यंत देशाला 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचे स्वप्न सर्वांसमोर ठेवले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like