Budget Expectations : Income Tax मध्ये कपातीशिवाय ‘या’ गोष्टींमध्ये मध्यमवर्गीयांना मिळणार ‘दिलासा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या वर्षी कॉर्पोरेट टॅक्समध्ये सूट मिळाल्यानंतर आता सर्वांच्या नजरा आगामी बजेटमध्ये मिळणाऱ्या वैयक्तिक प्राप्तीकरातील संभाव्य सवलतींवर आहे. परंतु यात किती सूट मिळणार हे बजेट साजर झाल्यानंतरच कळेल. परंतु तज्ज्ञ सांगतात जर असं झालं नाही तर सरकार इतर पर्यायाच्या माध्यमातून वैयक्तिक प्राप्तीकरात दिलासा देण्याची शक्यता आहे. असं म्हटलं जात आहे की, विमा क्षेत्रातील गुंतवणुकीवर मिळणारी प्राप्तीकर सूट एक मोठा पर्याय असू शकतो. निवडक विमा योजनांवर हे पाऊल टाकण्याची शक्यता आहे.

टर्म इंश्योरंस प्लॅनमधील गुंतवणूकीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार वैयक्तिक प्राप्तीकरातील सवलतीत वाढ करू शकतं. एगॉन लाईफ इंश्योरंसचे एमडी व सीईओ विनीत अरोरा यांचं म्हणणं आहे की, हा प्लॅन स्वस्त तर आहेच परंतु ग्राहकांसाठीही खूप उपयोगी आहे. अशा योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना 25000 रुपयांपर्यंत अतिरीक्त सवलत देण्यासाठी सरकारनं तरतूद करायला हवी. विमा योजेनत लोकांचा रस वाढवण्यासाठी विमा नियामक आणि विकास प्राधिकरण(IRDA) टर्म विमा प्लॅनला प्रोत्साहन देताना दिसत आहे.

रिटायरमेंट बेनिफिट टॅक्स फ्री करण्याचा पर्याय

सर्व प्रकारच्या रिटायरमेंट बेनिफिटला टॅक्स फ्री करण्याचा पर्यायदेखील सरकारकडे आहे. कॉर्पोरेट टॅक्समधील कपातीच्या व्याप्तीच्या बाहेर असणाऱ्या सर्व लहान उद्योजकांना सरकार वैयक्तिक प्राप्तीकरात काही सवलत देण्याची शक्यता आहे. ब्रिकवर्कच्या रेटींगनुसार, अर्थव्यवस्थेत मागणी करणं हे सरकारसमोरचं सर्वात मोठं आव्हान आहे.

त्यामुळे मागणी निर्माण करण्याचा फोकस त्याच क्षेत्रांवर असावा जिथे सर्वात जास्त गरज आहे. एजन्सीनुसार यात इन्फ्रास्ट्रक्चर, ऑटोमोबाईल, पावर, टेलीकॉम, स्टील आणि रिअल इस्टेट प्रमुख आहेत. अर्थव्यवस्थेत रोजगार निर्माण करणे आणि त्याची गती वाढवण्यात या सर्व क्षेत्रांची महत्त्वाची भूमिका आहे.

फेसबुक पेज लाईक करा