Budget 2020 : Income Tax शिवाय ‘या’ 4 बाबतीत देखील मध्यमवर्गीयांना मिळू शकतो मोठा ‘दिलासा’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या वर्षी मिळालेल्या कॉरपोरेट करातील सूट नंतर आता सगळ्यांचे लक्ष पुढील बजेटमध्ये मिळणाऱ्या वयक्तिक टॅक्स मधील सूटवर लागले आहे. मात्र अर्थ मंत्री निर्मला सीतारमन याच्याविषयी नेमका काय निर्णय घेतात हे तर या वर्षीचे बजेट आल्यानंतरच समजेल. जरी तसे झाले नाही तरी दुसऱ्या कोणत्या ना कोणत्या मार्गाने सरकार वयक्तीक कर मधील सुटीबाबत काही ना काहीतरी दिलासा नक्की देईल अशी अनेकांना आशा आहे. असा विश्वास आहे की विमा क्षेत्रात गुंतवणूकीवर प्राप्तिकरात सूट मिळवणे हा एक मोठा पर्याय असू शकतो. निवडक विमा योजनांवर हे पाऊल उचलले जाऊ शकते.

टर्म इन्शुरन्समध्ये गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन
टर्म इन्शुरन्समधील गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी वयक्तिक आयकरामधील सुटमधे वाढ करण्यात येऊ शकते. एगॉन लाइफ इन्शुरन्सचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विनीत अरोरा यांना खात्री आहे की, या योजना केवळ स्वस्त नाहीत तर ग्राहकांनाही उपयुक्त आहेत. अशा योजनेत गुंतवणूक करण्यासाठी सरकारने 25,000 रुपयांची अतिरिक्त सूट दिली पाहिजे. विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (आयआरडीए) देखील लोकांमध्ये विमा गुंतवणूक वाढविण्याच्या दृष्टीकोनातून टर्म विमा योजनांना सतत प्रोत्साहन देत आहे. विम्यात 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणूकीसाठी सध्या आयकर कायद्याच्या कलम 80-सी अंतर्गत वयक्तिक आयकरात सूट देण्याची तरतूद आहे.

निवृत्ती नंतरच्या लाभला टॅक्स फ्री करण्याचा देखील आहे पर्याय
सर्व प्रकारच्या रिटायरमेंट बेनिफिटला देखील टॅक्स फ्री करण्याचा पर्याय सरकारकडे आहे. त्यामुळे कॉरपोरेट कारामधील सुटीचा फायदा न घेऊ शकलेल्या इतर छोट्या उद्योगपतींच्या वयक्तिक आयकराबाबत दिलासा देखील दिला जाऊ शकतो. हा दिलासा त्यांच्याकडून करण्यात आलेल्या गुंतवणुकीवर देखील अवलंबून आहे. पायाभूत सुविधा, वाहन, उर्जा, टेलिकॉम, स्टील आणि रिअल इस्टेट या सर्व क्षेत्रांची अर्थव्यवस्थेतील गती वाढविण्यात आणि रोजगार निर्मितीत महत्त्वपूर्ण भूमिका आहे.