Budget 2019 : वर्षभरात १ कोटी बँक खात्यातून काढल्यास २ लाखाचा टीडीएस ‘कट’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अर्थसंकल्पात मोदी सरकार करावर दिलासा देईल असे वाटत होते आणि आयकरातून सामान्याला दिलासा मिळेल अशी सामान्यांची अपेक्षा होती मात्र हवा तेवढा दिलासा मोदी सरकार सामान्या नागरिकांना देऊ शकले नाही. तर २ – ५ कोटी वार्षिक उत्पन्न असलेल्यांना मात्र मोदी सरकारने धक्का दिला आहे. त्यांच्यावर सरचार्ज लावण्यात आला आहे.

सामान्याना आयकरावर अर्थ संकल्पात काय सूट मिळाली, तर श्रीमंतावर सरचार्ज लावण्यात आला आहे. करासंबंधित मोदी सरकारने काय काय निर्णय घेणात आलेत ते पाहूयात –

१. ५ लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या करदात्यांना करातून सूट देण्यात आली आहे, ५ लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्यांना आयकर भरण्याची गरज पडणार नाही. बाकी कराच्या स्लॅबमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत.

२. तर २ ते ५ कोटी वार्षिक उत्पन्न असलेल्या करदात्यांवर कराचा भार वाढणार आहे. २ कोटी पेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या करदात्यांवर ३% आतिरिक्त कर लावण्यात आला आहे. तर ५ कोटी पेक्षा आधिक वार्षिक उत्पन्न असलेल्या करदात्यांवर ७ % आतिरिक्त कर लावण्यात आला आहे.

३. ४५ लाख रुपये गृहकर्जाच्या व्याजावर आयकर सूटमध्ये सीमा वाढवून ३.५ लाख करण्यात आली आहे, जी आधी २ लाख रुपये होती.

४. देशातील १२० कोटी नागरिकांकडे आधार कार्ड आहे, त्यामुळे पॅनकार्ड नसलेल्या करदात्यांना आता आधारकार्ड द्वारे कर भरता येऊ शकतो.

५. वर्षभरात १ कोटी पेक्षा आधिक रक्कम बँक खात्यातून काढल्यास त्यावर २ लाख रुपये टीडीएस बसेल.

६. इलेक्ट्रिक वाहन खरेदी करताना कर्ज घेतल्यास व्याजासकट कर्ज फेडल्यास त्यावर आयकरात १.५ लाखाची सूट देण्यात येईल.

७. ४०० कोटी वर्षिक टर्नओवर असलेल्या कंपन्यांना आता २५ % कॉर्पोरेट कर द्यावा लागेल. यातून ९९ % कंपन्या २५ % कॉर्पोरेट कराच्या आवाक्यात येतील.

‘किडनी स्टोन’ वर घरगुती रामबाण उपाय

Video : अभिनेत्री सनी लियोनीच्या सौंदर्याचं ‘राज’

तुमची त्वचा शुष्क आहे का? मग हे उपाय करून पाहा

फरार असलेले दिलीप तिडके अखेर लाचलुचपत अधिकाऱ्याच्या जाळ्यात

खुशखबर ! निवृत्तीचे वय वाढविण्याचा सरकारचा विचार

सावधान ! ‘कॅन्सर’ला धुम्रपानापेक्षा लठ्ठपणा अधिक कारणीभूत

‘हे’ आहेत दही खाण्याचे फायदे

‘या’ पेयाचे नियमित सेवन करा आणि उत्तम आरोग्य मिळवा

सेल्युलाइटवर नियंत्रण मिळवायचे असेल तर करा ‘हे’ उपाय