राष्ट्रपतींच्या अभिभाषणादरम्यान सभागृहात ‘गोंधळ’ !

नवी दिल्ली : वृतसंस्था – संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास शुक्रवारपासून (३१ जानेवारी) सुरूवात झाली आहे. नेहमीप्रमाणे राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने या अधिवेशनाची सुरुवात होते. ज्यात सरकारने केलेली कामे आणि त्यांचे लक्ष्य या सर्वांची रुपरेषा असते. कोणतेही सदस्य अभिभाषणादरम्यान गोंधळ घालत नाहीत. मात्र आज झालेल्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणात नागरिकत्व सुधारित कायद्याचा उल्लेख आल्यांनतर सत्ताधाऱ्यांनी बाकं वाजवत या कायद्याच्या बाजूने जोरदार समर्थन केलं, तर दुसरीकडे विरोधी पक्षांनी सभागृहात एकच गोंधळ घातला.

राष्ट्रपती या अभिभाषणादरम्यान महात्मा गांधींनी म्हटले होते, जे हिंदू पाकिस्तानात राहू इच्छित नाहीत ते हिंदुस्थानात येऊ शकतात. कारण फाळणीच्या वेळी हिंदुस्थानी नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. त्यामुळे माझ्या सरकारने नागरिकत्व सुधारित कायदा (CAA) लागू करून महात्मा गांधी यांची इच्छा पूर्ण केली,’ असे राष्ट्रपतींनी म्हणताच सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी बाकं वाजवून या बाजूने जोरदार समर्थन केलं. हा आवाज सुरु असतंच मग विरोधकांनीही आक्रमक पवित्र हाती घेतला. विरोधकांनी यावेळी या कायद्या विरोधात घोषणाबाजी केली सोबतच प्रचंड गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे सभागृहाची शांतता भंग झाली, दरम्यान काही वेळानंतर दोन्ही बाजूचे सदस्य शांत बसले .

दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या अभिभाषणावेळी पाकिस्तानात हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यांची निंदा व्यक्त करत ननकाना साहिबमधील घटनेचाही उल्लेख केला.