राष्ट्रपती कोविंद यांनी अभिभाषणात अर्थव्यवस्थेबाबत केलं मोठं विधान; म्हणाले…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget 2021) सुरु होत आहे. येत्या 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी अभिभाषण केले. यामध्ये त्यांनी देशभरात पसरलेल्या महामारीत हा अर्थसंकल्प अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगितले.

2021-22 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन या आज (शुक्रवार) आर्थिक सर्वेक्षण सादर करणार आहेत. आपल्या अभिभाषणात राष्ट्रपती कोविंद म्हणाले, देशातील गरीब महिलांच्या खात्यात 31 हजार कोटी रुपये जनधन खात्यांमध्ये थेट ट्रान्सफर करण्यात येणार आहे. तसेच याचदरम्यान देशभरात उज्ज्वला योजनेच्या लाभार्थी महिलांना 14 कोटींपेक्षा अधिक मोफत गॅस सिलेंडरही मिळाले आहेत.

तसेच ते पुढे म्हणाले, डिसेंबर 2020 या वर्षासाठी UPI च्या माध्यमातून 4 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक डिजिटल पेमेंट झाले आहे. आज देशातील 200 पेक्षा अधिक बँका UPI व्यवस्थेशी जोडल्या गेल्या आहेत. याशिवाय आत्तापर्यंत 24 हजारांपेक्षा जास्त लोकांना रुग्णालयात आयुष्यमान योजनेचा फायदा मिळत आहे. जन-औषधी योजनेंतर्गत देशभरात 7 हजार केंद्रांहून गरिबांना स्वस्तात औषधे मिळत आहेत.

मुद्रा योजनेंतर्गत कर्जाची सुविधा
केंद्र सरकारने देशातील महिलांना स्वयंरोजगार बनण्यासाठी मुद्रा योजनेंतर्गत 25 कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज दिले आहे. यामध्ये जवळपास 70 टक्के कर्ज महिला उद्योजकांना मिळाले आहे.