नेहरूंमुळेच पाकव्याप्त काश्मीरची निर्मिती : गृहमंत्री अमित शहा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राज्यसभेत कलम ३७० हटविण्याचा प्रस्ताव पास झाल्यानंतर आता लोकसभेत हा प्रस्ताव मांडला जात आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली आहे. अमित शहा लोकसभेत म्हणाले की, जेव्हा आपले सैन्य काश्मीरमध्ये विजयी होत होते, पाकिस्तानी सैन्याला पळवून लावत होते तेव्हा नेहरूंनी युद्ध थांबविले. त्यांच्यामुळेच पाकव्याप्त काश्मीरची निर्मिती झाली आहे. त्यावेळी सैन्याला रोखण्यात आले नसते तर आज पाकव्यात काश्मीर भारताचा भाग असले असते. तत्कालीन गृहमंत्र्यांना विश्वासात न घेता नेहरूजी संयुक्त राष्ट्रात हा मुद्दा घेऊन गेले.

कलम ३७० मुळे पाकिस्तान जम्मू-काश्मीरमध्ये फुटीरतावादी भावना भडकवित आहे. गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, ३७० मुळे या देशाचा कायदा तिथे पोचला नाही. तसेच ३७१ महाराष्ट्र हा विकासाशी निगडित आहे आणि तो आम्ही का काढू ? याचा परिणाम देशाच्या अखंडतेवर आणि एकतेवर होत नाही, याची तुलना ३७० कालमाशी करता येणार नाही. राज्यांच्या काही समस्या ३७१ मध्ये ठेवल्या गेल्या आहेत आणि त्यांची तुलना ३७० कलमशी करणे योग्य नाही आणि आम्ही ते हटवणार नाही.

आरोग्यविषयक वृत्त