गृहमंत्रीजी, हिंमत असेल तर गोडसेला ‘दहशतवादी’ बोला : काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राज्यसभेत UAPA विधेयकावर चर्चा सुरु असताना काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. सिब्बल यांनी गृहमंत्री अमित शहा यांना म्हंटले की, गृहमंत्रीजी, हिंमत असेल तर गोडसेला दहशतवादी बोला.

सिब्बल यांनी म्हंटले की, हाफिज सईद हा जर दहशतवादी असेल तर गोडसे देखील दहशतवादी आहे. पण तसे बोलण्याची तुमच्यात हिंमत नाही. १९४७ पासून आतापर्यंत गोडसे दहशतवादी आहे असे म्हणण्याची आपली हिंमत नाही. आज तुम्ही अशा लोकांना तुरूंगात ठेवले आहे. जे संयुक्त राष्ट्रांकडून पैसे घेणारे शिक्षणतज्ज्ञ आहेत. तुम्ही उद्या त्यांना दहशतवादी म्हणून सांगाल. हे सर्व आपल्या हेतूंवर अवलंबून असेल.

राज्यसभेत सध्या UAPA म्हणजे (अनालॉफुल ऍक्टिव्हिटी प्रिवेंटेशन ऍक्ट २०१९) या विधेयकाववर चर्चा सुरु आहे. या चर्चेदरम्यान कपिल सिब्बल यांनी सरकारवर टीका केली आहे. पॉस्को कायद्यासंबंधी देखील राज्यसभेत चर्चा चालू आहे.

आरोग्यविषयक वृत्त