Budh Gochar 2020 : बुध ग्रहाचे राशी परिवर्तन, ‘या’ 6 राशीवाल्यांचे बदलतील दिवस

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बुध ग्रहाने आज सकाळी 11 वाजून 26 मिनिटांनी आपली रास बदलली आहे. बुधाने वृश्चिकमधून निघून धनु राशीत प्रवेश केला आहे. धनुला भाग्य भाव आणि अग्नी तत्वाची रास मानली जाते. या राशीत बुधाच्या गोचरमुळे सर्व राशींना जलद परिणाम मिळतील. बुध ग्रहाने राशी बदलल्याने काही राशींचे नशीब बदलणार आहे तर काही राशीच्या लोकांना या काळात सावध राहावे लागणार आहे. सर्व राशींवर या गोचरचा कसा प्रभाव पडणार आहे ते जाणून घेवूयात…

मेष –
बुध ग्रहाचे गोचर तुमच्यासाठी काही समस्या घेऊन आले आहे. प्रवासादरम्यान तुम्हाला थोडीशी असुविधा होऊ शकते, म्हणून निघण्यापूर्वी पूर्ण तयारी करा. या प्रवासातून भविष्यात फायदा होईल. म्हणून प्रत्येक गोष्टीची विशेष काळजी घ्या. गोचर काळात तुमची जोखीम घेण्याची क्षमता वाढेल आणि व्यवसायात लाभ होण्यास सुरूवात होईल. यश मिळविण्यासाठी या काळात मेहनत करावी लागेल. भावा-बहिणींचे पूर्ण सहकार्य मिळेल. मार्केटिंग, कम्युनिकेशन किंवा लेखन क्षेत्रात असल्यास कालावधी खूप फायदेशीर ठरेल. उच्च शिक्षण क्षेत्रात यश मिळेल.

वृषभ –
प्रेम प्रकरणांच्या बाबतीत हा काळ खूप चांगला ठरणार आहे. गोचर काळात जोडीदारासोबत पूर्ण वेळ घालवाल. नाते मजबूत होईल आणि एकमेकांवर विश्वास वाढेल. गोचरच्या परिणामामुळे पैशाच्या बाबतीत अनेक आव्हानांना सामोरे जावे लागेल. या काळात धनहानी होऊ शकते. आपल्याच काही लोकांद्वारे फसवणूक होऊ शकते. संततीकडून एखादी चांगली बातमी मिळेल. त्यांचा आनंद आणि प्रगती पाहून मानसिक समाधान मिळेल.

मिथुन –
आपल्या राशीचा स्वामी बुध असल्याने हे गोचर खूप परिणाम करणारे आहे. या परिणामामुळे, व्यवसायात भरपूर फायदा होईल आणि व्यवसाय आणखी वाढवाल. काही नवीन योजना देखील सुरू केल्या जाऊ शकतात ज्यामुळे व्यवसायात भविष्यात फायदा होईल. राशीचे हे परिवर्तन वैवाहिक जीवनासाठी अनुकूल असेल. जोडीदाराबरोबर सुरू असलेला तणाव संपेल आणि दोघेही एकत्र चांगला वेळ घालवाल. संबंध पूर्वीपेक्षा मजबूत होतील. प्रतिमा समाजात चांगली होईल. या गोचर काळात एखाद्या मालमत्तेसंदर्भात मोठा निर्णय घ्याल. मालमत्ता खरेदी केल्याने आपला आनंद दुप्पट होईल.

कर्क –
बुध गोचरच्या प्रभावामुळे तुमचे खर्च अचानक वाढतील आणि यामुळे आर्थिक स्थिती बिघडू शकते. या काळात विरोधकांपासून सुद्धा सावध राहावे लागेल. ते आपल्याविरूद्ध एखादे षडयंत्र आखू शकतात. पण, तुम्ही पूर्ण धैर्याने सामोरे जाल. यावेळी, बोलणे देखील नियंत्रित ठेवावे लागेल. अन्यथा एखाद्या वादात अडकू शकता. कटू शब्दांमुळे अनेकांचे वैरी व्हाल. कार्यक्षेत्रात नुकसान सहन करावे लागेल. यादरम्यान खुप मेहनत कराल आणि लोक तुमची स्तुतीसुद्धा करतील. ज्यामुळे आत्मविश्वास वाढेल.

सिंह –
या गोचरच्या परिणामामुळे आर्थिक स्थिती खुपच मजबूत होणार आहे. उत्पन्न वाढेल आणि कार्यक्षेत्रात फायदा होईल. व्यवसायात मोठा फायदा होणार आहे. कुठूनतरी अचानक पैसे मिळू शकतात. याशिवाय, काही लोक त्यांच्या व्यवसायात किरकोळ बदल करण्याचा विचार देखील करतील, जे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरेल. हे गोचर संततीसाठी चांगले आहे. बुधचा प्रभाव विद्यार्थ्यांची प्रगती तीव्र करेल. प्रेमसंबंधात नात्यातील समस्या दूर होतील आणि नाते आणखी मजबूत होईल. या दरम्यान, प्रवास देखील होईल.

Advt.

कन्या –
बुध हा कन्या राशीचा स्वामी आहे, म्हणून त्याचा नक्कीच तुमच्यावर परिणाम होईल. या गोचरच्या परिणामामुळे तुमच्या कौटुंबिक जीवनात चढ-उतार होऊ शकतात. कुटुंबातील सदस्यांना समजावण्याचा प्रयत्न कराल. यावेळी संपूर्ण लक्ष कुटुंबातील ऐक्य टिकवून ठेवण्यावर असेल. या वेळी जबाबदारी आणि खर्च दोन्ही वाढतील. या काळात मालमत्तेचा फायदा देखील होऊ शकतो. जर वाहन घ्यायचे असेल तर हा चांगला काळ आहे. कार्यक्षेत्रात सामर्थ्य मिळेल आणि कार्यकुशलतेने सर्वांना प्रभावित कराल, चांगले परिणाम मिळतील. या गोचरमुळे व्यावसायिकांनाही खुप फायदा होणार आहे.

तुळ –
तूळ राशीच्या लोकांना बुध गोचरचा चांगला परिणाम मिळेल. आपले म्हणणे उघडपणे इतरांसमोर मांडण्यात यशस्वी व्हाल. यामुळे आत्मविश्वास वाढेल. काम वेगाने करण्याचा प्रयत्न कराल. भाग्याची पूर्ण सहकार्य मिळेल. प्रगतीची मार्ग खुले होतील. भाग्योदयामुळे अडलेली कामे होण्यास सुरवात होईल. समाजात मान सन्मान मिळेल. या दरमयान काही जुन्या मित्रांनाची भेटू होऊ शकते. तुमची लोकप्रियता वाढेल. भावंडांसोबतचे नाते अधिक मजबूत होईल. परदेशी संपर्कातूनही लाभ होऊ शकतो.

वृश्चिक –
बुध गोचरमुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. उत्पन्न वाढल्याने लाभ होईल. यावेळी चांगली बचत कराल, ज्यामुळे स्थिती मजबूत होईल. कुटुंबालाही याचा लाभ होईल. कुटुंबात काही नवीन कार्य होऊ शकतात, ज्यामध्ये तुमची उपस्थिती आवश्यक असेल. यावेळी आपण कुटुंबासाठीच्या आपल्या जबाबदार्‍या पूर्ण कराल आणि लोक आपला आदर करतील. तुम्हाला अशा काही ठिकाणांहून लाभ होतील ज्याच कधी विचारही केला नव्हता. मात्र, तुम्हाला तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल, नुकसान होऊ शकते. सासरच्या लोकांकडूनही लाभ मिळण्याची शक्यता आहे.

धनु –
बुध गोचर तुमच्या राशीत होत आहे, म्हणून त्याचा थेट परिणाम तुमच्यावर होईल. तुमची लोकप्रियता वाढेल. तुमचे मौजमजेची शैली लोकांना आवडेल. नव नवीन मित्र बनवाल आणि सामाजिक स्थिती चांगली होईल. व्यवसायाच्या दृष्टीकोनातून हे गोचर खूप उपयुक्त ठरेल. सतत होणार्‍या लाभांमुळे खूप आनंदी व्हाल. वैवाहिक जीवनात सुरू असलेल्या समस्या दूर होतील. नाते मजबूत होईल. जोडीदाराशी जवळीक वाढेल. कार्यक्षेत्रात स्थिती मजबूत होईल, परंतु स्वतःकडे लक्ष देण्याची आवश्यकता असेल.

मकर –
या राशी परिवर्तनाने तुमच्या शत्रूंची संख्या वाढेल, मात्र त्यांचा दृढनिष्ठपणे सामना कराल. यावेळी ते तुमचे नुकसान करण्याचा पूर्ण प्रयत्न करतील परंतु तुम्ही त्यांना संधी देणार नाही. खर्च वाढेल, यासाठी बजेट तयार करून वाटचाल करा. आर्थिक स्थितीवर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही. याकाळात शहर बदलण्यात किंवा परदेशात जाण्यात काही लोकांना यश मिळू शकते. या प्रवासातून मोठा लाभ होईल. भाग्याची पूर्ण साथ मिळेल. कामात अडथळा येणार नाही. मोकळेपणाने खर्च कराल. बुधचे गोचर कर्जातून मुक्त सुद्धा करू शकते.

कुंभ –
या काळात तुमचे संपूर्ण लक्ष पैसे मिळविण्यावर असेल. यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. बुद्धिमत्तेचा पुरेपूर वापर कराल. सर्व बाजूंनी फायदा होईल. सामाजिक वर्तुळ देखील वाढेल. काही नवीन लोकांना आणि मित्रांना भेटण्याची संधी मिळेल. काही व्यापार्‍यांशी सुद्धा संपर्क साधू शकता. या दरम्यान आपला व्यवसाय वाढविण्यावर देखील लक्ष केंद्रित कराल. हे गोचर प्रेमसंबंधासाठी देखील चांगले ठरेल. प्रिय व्यक्तीबरोबर वेळ घालवण्याच्या अनेक संधी मिळतील, नातं खूप मजबूत होईल. संततीला शिक्षणामध्ये पूर्ण यश मिळेल.

मीन –
या काळात तुमचा हजरजबाबीपणा लोकांना आवडेल. आपल्या कार्यक्षेत्रात बिनधास्त सहभागी व्हाल. कार्यक्षमतेने आणि कौशल्यामुळे वरिष्ठ प्रभावित होतील. कौशल्यामुळे अनेक नवीन संधी मिळतील. पदामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात शांती व आनंद मिळेल. कुटुंबातील लोकांमध्ये समन्वय राहील, ज्यामुळे संबंध मजबूत होतील. कुटुंबाची प्रगती होईल. कुटुंबाच्या जबाबदार्‍या पार पाडल्याने आनंदी व समाधानी व्हाल. मात्र, दाम्पत्य जीवनासाठी हा काळ थोडा कठीण असू शकतो. जोडीदाराबरोबर बसून आपसात समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा.