बुध ग्रहानं रास बदलताच बनला ‘बुधादित्य’ योग, 6 राशींना 15 दिवस होईल फायदा, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बुध ग्रहाने रविवार, 2 ऑगस्टला कर्क राशीत प्रवेश केला आहे. बुध कर्क राशीत येताच बुधादित्य योग तयार झाला आहे. हा योग खुप शुभ मानला जातो. बुधादित्य योग बुध आणि सूर्याच्या युतीतून तयार होतो. कोणत्याही भावात दोन्ही ग्रहांच्या सोबत बसण्याने हा योग निर्माण होतो. बुधादित्य योगमुळे पुढील 15 दिवस अनेक राशींना खुप फायदा होणार आहे. प्रामुख्याने मेष, मिथुन, कन्या, तुळ, धनु आणि कुंभ राशीवाल्यांना जास्त लाभ होणार आहे. बुध गोचरमुळे होणार्‍या बुधादित्य योगमुळे सर्व राशींवर कसा प्रभाव पडणार आहे, ते जाणून घेवूयात.

मेष
मेष राशीच्या चतुर्थ भावात बुध ग्रहाचे गोचर होईल. बुधाला वाणी आणि बुद्धीचा कारक मानले जाते. यामुळे यश मिळेल. नोकरी शोधणार्‍यांना यश मिळेल. आईच्या आरोग्यासह आपल्या आरोग्याचीही काळजी घ्या. भाऊ-बहिणींना लाभ होईल. त्यांना शिक्षण, करियरमध्ये संधी मिळेल.

वृषभ
वृषभ राशीत तृतीय भावात बुध ग्रहाचे गोचर होईल. याची साहस, पराक्रम, लेखन इत्यादीत गणना होते. उत्पन्नाचे नवे स्त्रोत सापडतील. आर्थिक स्थिती सुधारेल. घेतलेले उधार चुकते करू शकता. विद्यार्थ्यांमध्ये रचनात्मकता दिसेल. इतरांना प्रभावित कराल.

मिथुन
बुद्धीचा कारक ग्रह बुधाचे गोचर द्वितीय भावात असेल. बुधाच्या कर्क राशीतील गोचरमुळे नोकरी मिळेल, उत्पन्नाचे स्त्रोत सुद्धा मिळतील. पैसा साठवण्याचे विचार मनात येतील. पैसे बचत करण्यात यशस्वी देखील व्हाल. आई किंवा आईकडील लोकांकडून लाभ होऊ शकतो.

कर्क
चंद्राचे स्वामित्व असणार्‍या कर्क राशीच्या जातकांच्या लग्न भावात बुधाचे गोचर होईल. या भावामुळे चरित्र, स्वभाव, व्यक्तिमत्व आणि आत्मा याबाबत जाणीव होते. हि स्थिती तुमच्यासाठी आव्हानात्मक असू शकते. कामाच्या पद्धतीत सुधारणा आणण्याची गरज आहे. व्यापार किंवा नोकरी करणार्‍यांनी आपल्या कार्यक्षेत्रात जास्त मेहनत केली पाहिजे. जर काम टाळले तर येणार्‍या काळात अडचणी वाढतील.

सिंह
सिंह राशीच्या द्वादश भावात बुध ग्रहाचे गोचर होत आहे. या भावातून व्यय, हानी, दंड इत्यादी बाबत विचार केला जातो. बुधाचे हे गोचर सिंह राशीच्या जातकांसाठी जीवनात समस्या आणू शकते. या दरम्यान मानसिक दृष्ट्या स्वताला सुदृढ बनवा. प्रेरणादायक पुस्तके वाचा.

कन्या
बुध ग्रहाचे गोचर तुमच्या राशीच्या एकादश भावात असेल. हे स्थान लाभाच्या भावात ओळखले जाते आणि यामुळे तुमच्या इच्छा, मित्र, मोठे बहिण-भाऊ इत्यादींच्या बाबत विचार केला जातो. कन्या राशीच्या जातकांसाठी बुधाचे हे गोचर खुप चांगले राहण्याची अपेक्षा आहे. आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तूम्ही पूर्ण प्रयत्न कराल. यश मिळण्याची सुद्धा पूर्ण शक्यता आहे.

तुळ
तुळ राशीच्या जातकांसाठी दशम भावात बुध ग्रहाचे गोचर होणार आहे. या भावामुळे तुमचे कर्म, कार्यक्षेत्र, व्यवसाय, नेतृत्व क्षमता इत्यादीचा विचार केला जातो. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी चांगला काळ आहे. विद्यार्थ्यांनी दृढ संकल्प करावा.

वृश्चिक
बुद्धीची देवता समजल्या जाणार्‍या बुधदेवाचे गोचर आपल्या राशीत नवम भावात होईल. या भावामुळे आपण सौभाग्य, धर्म, चरित्र, दूरचा प्रवास याबाबत विचार करतो. तुमच्या नवम भावात बुध गोचर खुप चांगले म्हणता येणार नाही.

धनु
धनु राशीच्या जातकांच्या अष्टम भावात बुध ग्रहाचे गोचर होईल. अष्टम भावातून आपण वय, जीवनात येत असलेल्या समस्या, अडचणी, वारसा संपत्ती इत्यादी बाबत विचार करतो. बुधाचे हे गोचर धनु राशीसाठी शुभ ठरण्याची शक्यता आहे. नोकरदारांसाठी हे गोचर अनुकूल राहील. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत खुले होतील. ज्यामुळे आर्थिक तंगी दूर होईल.

मकर
बुध ग्रहाचे गोचर तुमच्या राशीत सप्तम भावात होईल. हा भाव भागीदारी, जोडीदार इत्यादीचा आहे. या भावात बुधाच्या गोचरमुळे प्रणयाशी संबंधीत काही अडचणी येऊ शकतात. जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात. छोट्या प्रवासातून लाभ होऊ शकतो.

कुंभ
कुंभ राशीच्या जातकांच्या षष्ठम भावात बुध ग्रहाचे गोचर होईल. या भावातून रोग, कर्ज, वाद, मामा, मामी, शत्रु इत्यादी बाबात विचार केला जातो. कुंभ राशीच्या जातकांसाठी बुधाचे हे गोचर शुभ आहे. या दरम्यान, जीवनाच्या अनेक क्षेत्रात लाभ मिळू शकतो. उत्पन्नाबाबत जर त्रस्त असाल तर त्यामध्ये वाढ होऊ शकते.

मीन
तुमच्या पंचम भावात बुध ग्रहाचे गोचर होईल. पंचम भावातून संतती, शिक्षण, बुद्धी, प्रेम-संबंध, प्रतिष्ठा इत्यादी बाबत विचार केला जातो. कर्क राशीत बुधाचे हे गोचर तुमच्यासाठी आव्हानात्मक राहू शकते. या राशीच्या लोकांच्या एकाग्रतेमध्ये कमतरता येऊ शकते, विशेषकरून जे लोक शिक्षण घेत आहेत त्यांना हा त्रास होऊ शकतो. कार्यक्षेत्रात विरोधकांपासून सावध राहा.