Budh vakri 2020 : बुध ‘वक्री’ झाल्याने 4 राशीवाल्यांनी रहावे सावध, धन-व्यापरावर संकट

Budh vakri 2020 : व्यापार, बुद्धी आणि वाणीचा कारक म्हणून ओळखला जाणारा बुध ग्रह 14 ऑक्टोबर 2020 ला वक्री होत आहे. बुध तुळ राशीत वक्री होईल. ज्योतिषतज्ज्ञ यास अतिशय महत्वापूर्ण घटना मानत आहेत. 3 नोव्हेंबर 2020 पर्यंत बुध वक्री मार्गक्रमण करणार आहे. वक्री बुधाचा सर्व राशींवर चांगला, वाईट परिणाम पडणार आहे. ज्योतिषतज्ज्ञांनुसार, बुध व्रकी असल्याने मेष, वृषभ, वृश्चिक आणि मीन राशीच्या जातकांनी सावध राहाण्याची आवश्यकता आहे.

मेष
या गोचरदरम्यान वक्री आवस्थेत बुध तुमच्या सप्तम भावात गोचर करेल. तुमच्या वैवाहिक जीवनात यामुळे अनेक चढ-उतार होणार आहेत. पार्टनरशिपच्या बिझनेसमध्ये वाद वाढू शकतात. जर तुम्ही विवाह करणार असाल तर, सध्या लग्नाची तारीख बुध मार्गस्थ होईपर्यंत पुढे ढकला, अन्यथा त्रास होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी प्रत्येक प्रकारचे वाद आणि भांडण यांच्यापासून दूर राहणे हाच चांगला पर्याय राहील.

वृषभ
बुध वक्री अवस्थेत तुमच्या षष्टम भावात प्रवेश करेल. ज्योतिषमध्ये या भावाला शत्रू भाव म्हटले जाते. या भावातून विरोधक, रोग, समस्या, जॉब, स्पर्धा, रोगप्रतिकारशक्ती, विवाहात विभक्तता आणि कायदेशिर वाद म्हणून पाहिले जाते. बुधाचे हे गोचर तुमच्यासाठी चांगले संकत देणारे नाही. कार्यक्षेत्रापासून आपल्या प्रत्येक योजनेत नियमितपणे व्यवस्था राखणे गरजेचे असेल, तेव्हाच कोणतेही कार्य यशस्वी होऊ शकते.

मिथुन
वक्री बुध वेगाने तुमच्या पंचम भावात प्रवेश करेल. या भावाकडे रोमान्स, संतती, रचनात्मकता, बौद्धिक क्षमता, शिक्षण आणि नव्या संधी म्हणून पाहिले जाते. तुम्ही प्रत्येक आव्हानासाठी स्वताला तयार ठेवले पाहिजे आणि संधी मिळताच आपली प्रतिभा सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कौटुंबिक जीवनात तुमच्यामुळे आईला एखादा लाभ होऊ शकतो. या दरम्यान तुमच्यात आत्मविश्वास आणि रचनात्मकता वाढलेली स्पष्टपणे जाणवेल. विवाहित जातकांच्या जीवनात एखादे जूने प्रेम परतू शकते.

कर्क
बुध तुमच्या चतुर्थ भावात गोचर करेल. कुंडलीच्या चौथ्या भावाला सुख भाव म्हटले जाते. या भावातून माता, जीवनात मिळणारी सर्व प्रकारची सूख, संपत्ती, लोकप्रियता आणि भावनांकडे पाहिले जाते. वक्री बुधाच्या गोचर दरम्यान, तुम्ही तुमची सर्व उर्जा घराची दुरूस्ती आणि निटनेटकेपणावर लावताना दिसाल. सजावटीवर मुक्तपणे खर्च करताना दिसाल. मात्र, असे करताना आपल्या खर्चाकडे लक्ष द्या, अन्यथा जरूरीपेक्षा जास्त खर्च केल्याने आर्थिक तंगी येऊ शकते.

सिंह
वक्री बुध तुमच्या तृतीय भावात प्रवेश करेल. कुंडलीत तिसरे घर सहज भाव म्हणून ओळखले जाते. या भावातून व्यक्तीचे साहस, इच्छाशक्ती, छोटे भाऊ-बहिण, जिज्ञासा, जिद्द, ऊर्जा, जोश आणि उत्साह पाहिला जातो. वक्री बुध तुमच्यासाठी अनुकूल राहणार आहे. भाऊ-बहिणीसोबत वेळ घालवाल. नात्यात येत असलेला दुरावा दूर होईल. मात्र, कार्यक्षेत्रात तुम्हाला जास्त मेहनत करावी लागेल. तेव्हा तुमच्या मनासारखी चांगली फलप्राप्ती होईल.

कन्या
बुध तुमच्या राशीत द्वितीय भावात प्रवेश करेल. ज्योतिषमध्ये दुसर्‍या भावातून व्यक्तीचे कुटुंब, त्याची वाणी, प्राथमिक शिक्षण आणि धन इत्यादीवर विचार केला जातो. वक्री बुध ग्रहाच्या या गोचर दरम्यान संमिश्र फलप्राप्ती होईल. आर्थिकदृष्ट्या धनसंचय करण्यात यश येईल, परंतु खर्चावर लगाम लावावा लागेल. जर तुम्ही एखादी नवी गुंतवणूक किंवा नवा व्यापर सुरू करणार असाल तर काळ खुप चांगला आहे. तुम्ही यातून धनलाभ मिळवण्यात यशस्वी व्हाल.

तुळ
वक्री बुधाचे गोचर तुमच्या प्रथम भावात होत आहे. यास लग्न भाव सुद्धा म्हटले जाते. प्रथम भावाला व्यक्तमत्वाचा आरसा म्हटले जाते. तुमच्या लग्नात वक्री बुध गोचर तुमच्यासाठी खुपच शुभ ठरणारे आहे. तुम्हाला भाग्याची साथ मिळेल, ज्यामुळे तुम्ही तुमच्या कामातील प्रत्येक बारकावा ओळखून काम पूर्ण कराल. यामुळे कामाच्या ठिकाणी खुप यश मिळेल. नवम भावामुळे तुम्हाला एखाद्या ज्येष्ठ म्हणजे वडील किंवा पितृतुल्य व्यक्तीचा सल्ला मिळत राहील, जो निर्णय घेण्यास मदत करेल.

वृश्चिक
बुध ग्रहाचे गोचर तुमच्या राशीत द्वादश भावात होईल. बुध ग्रह तुमच्यासाठी अष्टम तसेच एकादश भावाचा स्वामी आहे. ज्योतिषमध्ये द्वादश भाव व्यय भाव म्हणून ओळखले जाते. या भावाकडे खर्च, नुकसान, मोक्ष, परदेश प्रवास इत्यादी पाहिले जाते. अशावेळी या गोचर काळात वक्री बुध तुम्हाला प्रतिकुल फळ देईल. यादरम्यान तुम्हाला काही आरोग्यसंबधी समस्या किंवा अभूतपूर्व विपरीत स्थितीतून जावे लागू शकते. ज्यामुळे तुमचा पैसासुद्धा मोठ्याप्रमाणात खर्च होऊ शकतो. तुम्हाला अनेक प्रवास करण्याची संधी सुद्धा मिळू शकते. मात्र, या प्रवासांपासून दूर रहाणेच चांगले ठरेल.

धनु
वक्री बुध तुमच्या राशीसाठी सप्तम आणि दशम भावाचा स्वामी ग्रह आहे. या भावातून जीवनात प्राप्त सर्व संधी, मित्र, मोठे बहिण-भाऊ इत्यादी पाहिले जाते. बुध ग्रहाचे हे वक्री गोचर, तुमच्यासाठी विशेष लाभदायक सिद्ध होणार आहे. या दरम्यान तुम्हाला तुमची कमजोर पडलेली आर्थिक स्थिती मजबूत करण्याची संधी मिळेल. यामुळे तुम्हाला धनलाभासह सामाजिक सन्मान सुद्धा मिळू शकतो. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर यादरम्यान ती बदलण्यासाठी अनेक संधी मिळू शकतात.

मकर
बुध ग्रहाचे गोचर तुमच्या राशीत दशम भावात होईल. ज्योतिषमध्ये दशम भाव, करियर आणि प्रोफेशनल, पितृस्थिती, रूबाब, राजकीय आणि जीवनाचे लक्ष्य याची व्याख्या करते. यास कर्म भावसुद्धा म्हटले जाते. बुधाचे हे गोचर मकर राशीच्या जातकांसाठी विशेष भाग्यशाली असणार आहे. ही ती वेळा आहे, जेव्हा तुम्हाला तुमच्या मेहनतीनुसार फळ मिळेल. या दरम्यान मोठ्या कालावधीपासून थांबलेली कामेसुद्धा मार्गी लागतील. अचानक वाढ होईल. कार्यक्षेत्रात सहकार्‍यांची साथ लाभेल.

कुंभ
बुध ग्रह वक्री अवस्थेत तुमच्या राशीच्या नवम स्थानात गोचर करेल. ज्योतिषमध्ये नवम स्थान हे भाग्याचे स्थान म्हणून ओळखले जाते. या स्थानातून व्यक्तीचे भाग्य, गुरु, धर्म, प्रवास, तीर्थस्थळ, सिद्धांत यांचा विचार केला जातो. या गोचरमुळे अतिशय शुभ फळांची प्राप्ती होईल. प्रगती आणि उन्नतीच्या अनेक सुंदर संधी मिळतील. आर्थिक लाभ आणि अनेक भेटी सुद्धा मिळतील. तुमचे मन या गोचरच्या काळत्तत रहस्यमय विषय जसे की ज्योतिष विज्ञान, गुप्त विषय, इत्यादी वाचण्यात जास्त लागेल.

मीन
वक्री बुध ग्रह गोचरदरम्यान तुमच्या अष्टम भावात प्रवेश करेल. कुंडलीच्या अष्टम स्थानास आयुर्भाव म्हटले जाते. या भावातून जीवनात येणारे चढ-उतार, अचानक होणार्‍या घटना, वय, रहस्य, शोध इत्यादी पाहिले जाते. यासाठी मीन राशीच्या जातकांसाठी वक्री बुधाकडून कमी चांगल्या फळांची प्राप्ती होईल. मातेला आरोग्याचा त्रास होऊ शकतो. ज्यामुळे मानसिक तणाव वाढू शकतो. वैवाहिक जीवनात सुद्धा हे गोचर खुप चढ-उतार घेऊन येत आहे. जर तुम्ही पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करत असाल तर तुमच्यासाठी काळ चांगला नसल्याचे दिसत आहे. पैशाच्या बाबतीत सावध राहावे लागेल.