म्हशींनी अशा पध्दतीनं घेतला छळ करणार्‍यांचा बदला, व्हिडीओ पाहून तुम्ही म्हणाल ‘शब्बास’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गोष्ट माणसाची असो की, जनावारांची, जेव्हा अत्याचार आपली मर्यादा ओलांडतो तेव्हा कुणीही आपली मर्यादा ओलांडण्यास आणि बदला घेण्यासाठी तयार होतो. एका म्हैशीनेही आपल्यावर अत्याचार करणार्‍याचा बदला घेतला आहे, ज्याचे कौतूक होत आहे. अत्याचार करणार्‍याचा बदला घेणार्‍या म्हैशीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने वायरल होत आहे.

या व्हिडिओत 4 ते 5 तरूण एका म्हैसगाडीवर बसलेले दिसत आहेत आणि रस्त्यावर चालणार्‍या इतर गाड्यांच्या पुढे जाण्यासाठी सतत म्हैशीला काठीने मारत आहेत. जस – जशी मुले म्हैशीला काठीने मारत आहेत, तसतसा वेग वाढत चालला आहे. परंतु, एका कोपर्‍यावर म्हैस आपला रस्ता बदलते आणि डिव्हायडरवर गाडी आदळते आणि सर्व मुले खाली पडतात. एवढेच नव्हे तर मुले पडल्यानंतर म्हैस वेगाने पळून जाते.

हा व्हिडिओ भारतीय वन विभाचे अधिकारी प्रवीण कासवान यांनी ट्विटरवर शेयर केला आहे. आतापर्यंत हा व्हिडिाओ 2 लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. शेकडो लोकांनी या व्हिडिओवर कमेंट केले आहे. एका युजरने कमेंट केली आहे की, बरे झाले म्हैशीने मुलांना धडा शिकवला, अन्यथा यांनी आणखी दुसर्‍या जनावरावर अत्याचार केला असता.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like