51 लाख रुपयात म्हशीची विक्री करुन शेतकरी चळवळीत लंगर लावण्याची होतेय चर्चा, जाणून घ्या ‘वास्तव’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्याच्या निषेधार्थ दिल्ली सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी चळवळीत हरियाणातील एक शेतकऱ्याकडून 51 लाख रुपयांची म्हैस विकून लावण्यात आलेला लंगर चर्चेत आहे. पंजाबमधील माछीवाडा या खेड्यातील पशुपालक शेतकरी, पवित्र पशु सिंह यांनी आश्चर्यकारक खुलासा केला आले की, त्याने मोहरा जातीची सरस्वती म्हैस 51 लाखात खरेदी केली नाही, तर त्याने 7 म्हशीसह अडीच लाख रुपये रोख दिले होते. हा व्यवहार हरियाणाच्या सुखबीर टांडा यांच्याशी झाला.

यासंदर्भात पवित्र सिंह म्हणाले की, मी हरियाणाच्या जिल्हा हिसारमधील लाटणी गावच्या व्यापारी सुखबीर टांडाकडून सरस्वती म्हैस 51 लाखांत नाही तर 7 म्हशींसोबत अडीच लाख रुपयांच्या रोखसह खरेदी केली होती. पवित्र सिंह यांच्या मते सोशल मीडियावर हरियाणाचे व्यापारी सुखबीर टांडा यांनी मोहरा जातीची म्हैस सरस्वतीची 51 लाखांत विक्री केली असून दिल्लीत शेतकरी चळवळीत लंगर घातला आहे, असे सांगून लोकांची दिशाभूल केली जात आहे. यामध्ये सत्य म्हणजे सुखबीर टांडा यांनी निश्चितच शेतकरी चळवळीत लंगर लावला आहे, परंतु लोकांच्या सहकार्याने लावला आहे, ज्यात मी देखील सेवा करण्यासाठी आलो आहे.

पवित्र सिंह यांनी पुढे खुलासा केला की त्याने फेब्रुवारी महिन्यात सरस्वती विकत घेतली होती. मोहरा जातीच्या सरस्वती म्हशीच्या बदल्यात त्यांनी हरियाणाच्या व्यापारी सुखबीर टांडा यांना 7 म्हशी व अडीच लाख रुपये रोख दिले. आता मी दिलेल्या 7 म्हशी सुखबीर टांडा यांनी 51 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी किंमतीला विकली आहेत, मला याबद्दल काहीही माहिती नाही. त्याच वेळी पवित्र सिंह आणि नंबरदार हरजित सिंह म्हणाले की, सरस्वती म्हशी सुखबीर टांडाजवळ असताना एकावेळी 33.131 किलोग्रॅम दूध देण्याचा जागतिक विक्रम बनविला होता, तो पाकिस्तानच्या म्हशीने मोडत एका दिवसात 33.856 किलोग्रॅम दूध दिले.