चोरट्यांनी केले चक्क म्हशींचेच अपहरण, मालकाकडे मागितली लाखोंची खंडणी

उज्जैन : वृत्तसंस्था – मध्यप्रदेश राज्यातील उज्जैन येथे अपहरणाची घटना घडली आहे. तुम्ही म्हणाल यात काय विशेष? पण हे अपहरण माणसाचे झाले नसून चक्क म्हशीचे अपहरण झाले आहे. हे अपहरण ऐकवेळेस नाही तर दोनदा झाले आहे. अपहरण कर्त्यांनी म्हशीच्या मालकाकडे मोठी खंडणीची रक्कम मागितली आहे.

उज्जैनचे रहिवासी असणाऱ्या अंगूरबाला हाड़ा यांना रात्री उशिरा फोन आला आणि फोनवरून त्यांना सांगण्यात आले की, तुमच्या म्हशीचे अपहरण झाले आहे. यावेळेस त्यांनी पहिल्यापेक्षा जास्त पैसे खंडणी मागितली आहेत. अंगूरबाला हाड़ा या डेअरी फार्मच्या मालकीण आहेत. त्यांच्याजवळ मुऱ्हा जातीच्या अनेक म्हशी आहेत. या जातीच्या म्हशींची किंमत दिड लाख ते २ लाखांपर्यंत असते.

अंगूरबाला म्हणाल्या की, यापूर्वीही चोरांनी त्याच्या म्हशींचे अपहरण केले आणि पैशांची मागणी केली. यासंदर्भात त्याने पोलिसांची मदत घेण्याआधीच चोरांनी एका शेजाऱ्याला मध्यस्थ करून म्हशी परत देण्यासंबंधी व्यवहार करण्याची ऑफर दिली होती आणि पैसे देऊन आपली म्हैस परत मिळू शकेल असे सांगितले होते.

अंगूर बाला यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी चोरांची ऑफर स्वीकारली आणि एक लाख ३५ हजार रुपये भरल्यानंतर दुसर्‍या दिवशी त्याची म्हैस कराडी नाका येथून ताब्यात घेण्यात आली. जवळपास एक वर्षानंतर यावर्षी २८ जूनला त्यांनी दुग्धशाळेतील ४ म्हशी गायब असल्याचे पाहिले. गेल्या वर्षी म्हशींच्या अपहरणानंतर काही सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते ज्यात काही लोक म्हशी घेऊन जाताना दिसले.

हाडा यांनी अधिक माहिती घेतल्यावर कळले की, याच चोरांनी त्यांच्या म्हशींची पुन्हा एकदा चोरी केली आहे. यावेळेस हाडा यांनी चोरांशी व्यवहार न करता थेट पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी यासंदर्भात सांगितले की, गुरांच्या चोरीच्या बदल्यात जनावरांकडून पैसे मागितण्याची ही पहिली वेळ नाही . शाजापूरचे एसपी पंकज श्रीवास्तव म्हणाले की, कोतवाली पोलिसांनी फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

आरोग्यविषयक वृत्त –