PM नरेंद्र मोदींच्या दौर्‍यानंतर मालदीवकडून भारतासाठी ‘गोड’ बातमी

माले : वृत्तसंस्था – दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची धुरा सांभाळल्यानंतर मोदींनी मालदीवला भेट दिली. या भेटीनंतर दोन्ही देशातील द्विपक्षीय संबंध मजबूत होताना दिसत आहेत. पीएम मोदींच्या दौऱ्यानंतर मालदीवकडून भारतासाठी ‘गुड न्यूज मिळाली आहे. चीन आणि मालदीव दरम्यान हिंदी महासागरात वेधशाळा बांधण्याचा करारावर पुढील कार्यवाही थांबली आहे. त्यामुळे हा करार तुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

२०१७ मध्ये मालदीवचे माजी राष्ट्रपती यामीन यांनी चीनसोबत ‘प्रोटोकॉल ऑन इस्टेब्लिशमेंट ऑफ जॉइंट ओसन ऑब्जर्वेशन स्टेशन बिटवीन चायना अँड मालदीव्स’ नावाचा करार केला होता. हा करार चीनला मालदीवच्या उत्तरेकडील मकुनुधू येथे वेधशाळा बांधण्यासाठी परवानगी देण्यासाठी होता. यामुळे हिंदी महासागरातील महत्वाच्या मार्गावर चीनचे वर्चस्व निर्माण झाले असते. वेधशाळा बांधण्याचे ठिकाण भारताच्या समुद्र सीमेपासून जवळ आहे.  यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव भारताची चिंता वाढली होती.

चीनने मालदीवसमोर मैत्रीचा हात पुढे करत तसेच त्याला आर्थिक मदतीचे आमिष दाखवत कर्जाच्या सापळ्‌यात अडकवले आहे. याआधीचे राज्यकर्ते चीनच्या या भूमिकेला बळी पडले आहेत. आता सत्ता बदल झाला आहे. राष्ट्रपती इब्राहिम सोलिह यांनी सत्ता हाती घेतल्यानंतर मालदीवचे चीनसोबत असलेल्या द्विपक्षीय संबंधात कटुता आली आली आहे. तर मालदीवचे भारतासोबतचे द्विपक्षीय संबंध मजबूत होताना दिसत आहेत.

नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालदीवचा दौरा केला.  या दौऱ्यात मालदीवच्या ‘रुल ऑफ निशान इझ्झुदीन’ या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविण्यात आले आहे.

सिने जगत –

‘लैंगिक’ अत्याचाराचा आरोप झाल्यानंतर भडकला ‘हा’ अभिनेता म्हणाला, मी नशेमध्ये…

‘लस्ट स्टोरीज’मधील ‘व्हायब्रेटर सीन’बाबत कियारा आडवाणीचा मोठा ‘खुलासा’

… म्हणून अभिनेता शाहिद कपूरची प्रत्येक चित्रपटात ‘हटके’ हेअर ‘स्टाईल’

Video : छोटया पडद्यावरील ‘हॉट’ अभिनेत्री निया शर्माची ‘सोशल’वर धुमाकूळ